नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाईची गजेंद्र लक्ष्मी रूपात पूजा

कोल्हापूर; प्रतिनिधी : आदिमाया, आदिशक्ती करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बुधवारी (दि.३) शारदीय नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वास प्रारंभ झाला. आज (दि.४) शारदीय नवरात्र महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाईची गजेंद्र लक्ष्मी रुपात पूजा बांधण्यात आली आहे. (Shardiya Navratri 2024 )

कशी आहे आजची पूजा

देव व असूर यांच्या समुद्रमंधनातून जी १४ रत्ने निघाली. त्यात पहिली लक्ष्मी निघाली हिला कमला लक्ष्मीही म्हणतात. गजेंद्र लक्ष्मी अथवा गजलक्ष्मी म्हणण्याचे कारण की, लक्ष्मी जेव्हा समुद्र‌मंथनातून उत्पन्न झाली तेव्हा तिला हत्तींनी अमृत कुंभाने अभिषेक केला. ही दुर्भाग्याचा नाश करून सर्व सौभाग्य देणारी देवता आहे. हिच्या उपासनेने धन व समृद्धी लाभते. ऐश्वर्याच्या परमावधीचे प्रतिक म्हणून या देवीची उपासना करतात. ही पूजा श्रीपूजक विद्याधर मुनिश्वर, अरुणा मुनिश्वर, मयुर मुकुंद मुनिश्वर यांनी बांधली.

हेही वाचा :

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी