Shahu Chatrapati : खासदार शाहू छत्रपतींच्या प्रयत्नातून ६५ कोटींचा निधी मंजूर

Shahu Chatrapati

Shahu Chatrapati

कोल्हापूर : प्रतिनिधी : खासदार शाहू छत्रपतींच्या प्रयत्नातून कोल्हापूर जिल्ह्यात नदीवर नवीन पूल बांधण्यासाठी आणि रस्त्यांसाठी ६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. रस्ते, वाहतुक व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने प्रशासकीय मंजूर दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला आहे. गडहिंग्लज आणि नागनवाडी रस्त्यांला जोडणाऱ्या नदीवरील पुलांसाठी ४० कोटी तर पाचगाव ते बाचणी या रस्त्यांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.  (Shahu Chatrapati)

गारगोटी – गडहिंग्लज – नागनवाडी रस्त्यांवरील भडगांवनजीक नवीन पूल उभारण्याची मागणी नागरिकांतून होत होती. पावसाळ्यात महापुराचे पाणी येत असल्याने पुलावर पाणी येते आणि वाहतूक ठप्प होते. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन  खासदार शाहू छत्रपती यांनी रस्ते, वाहतुक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली भेट घेऊन त्यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यांनी निधी देण्याचे मान्य केले होते. तसेच आयटीआय – पाचगांव- वडगांव- खेबवडे – बाचणी हा ३० किलोमीटर लांबीचा रस्ता खराब झाल्यामुळे नवीन रस्त्याची मागणी होत होती. खासदार शाहू छत्रपतींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या कामांसाठी निधीचे मागणी करणारे पत्र दिले. त्यांनी दोन्ही विकास कामांसाठी निधी मंजूर झाला आहे. (Shahu Chatrapati)

गडहिंग्लज – नागनवाडी रस्त्यावरील मोठ्या पूलाच्या बांधकामास ४० कोटी तर कोल्हापुरातील आयटीआय – पाचगांव- वडगांव- खेबवडे – बाचणी या रस्त्यासाठी २५ कोटी असा ६५ कोटींचा निधी वितरीत करण्याास रस्ते, वाहतुक व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने प्रशासकीय मंजूर दिली आहे. (Shahu Chatrapati)

गडकरी यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे या दोन कामांसाठी केंद्र शासनाच्या रस्ते, वाहतूक, महामार्ग मंत्रालयाच्या केंद्रीय मार्ग निधीतून ६५ कोटी रुपये मंजूर केल्याने भडगाव जवळील पूलाचा तसेच कोल्हापूर ते बाचणी रस्त्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. लवकरच या कामांना सुरवात केली जाणार आहे. (Shahu Chatrapati)

हेही वाचा :

 ड्रॅगनचा अमेरिकेवर पलटवार

‘वक्फ’ संबंधी काँग्रेसची पुढील रणनीती काय?

Related posts

Satyashodhak marriage

Satyashodhak marriage: पुरोगामी धाग्याने जुळली शतजन्माची लग्नगाठ

Thackray  demand

Thackray  demand : देशभर शिवजयंतीची सुट्टी जाहीर करा

NMC

NMC: नागपूर महापालिकेची कोर्टासमोर बिनशर्त माफी