Shahid Champion : ‘एसएनडीटी’ महोत्सवात ‘शहीद’च्या मुलीच चॅम्पियन

Shahid Champion

कोल्हापूर : प्रतिनिधी : शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय, तिटवे येथे गेले दोन दिवस रंगलेल्या विभागीय युवा महोत्सवाची अखेर रंगतदार सांगता झाली. विविध कलाप्रकार, सर्जनशीलता आणि उत्साहाच्या बहारदार मेजवानीतून ‘शहीद’च्या रंगमंचावर संस्कृतीचे इंद्रधनुष्य फुलले. (Shahid Champion)

अकरा महाविद्यालयांच्या चुरशीच्या स्पर्धेत शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाने जनरल चॅम्पियनशिप पटकावून इतिहास रचला. तर उपविजेतेपद पुण्यातील एसएनडीटी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज फॉर वुमनने मिळवले.

विजेत्यांचा गौरव डॉ. नितीन प्रभू तेंडुलकर, एसएनडीटी सांस्कृतिक समन्वयक किरण गायकवाड, डीवायएसपी सुवर्णा पत्की व पीएसआय स्वाती यादव यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी वीरपत्नी लक्ष्मीबाई सिताराम पाटील होत्या. (Shahid Champion)

या महोत्सवात साडेतीनशेहून अधिक विद्यार्थिनींनी तब्बल २६ कला प्रकारांतून आपल्या कला सादर केल्या. लिटरेचर, थिएटर आणि डान्स या कलाप्रकारात ‘शहीद’ने चॅम्पियनशिप पटकावत वर्चस्व सिद्ध केले. म्युझिक इव्हेंटमध्ये पीजीएसआर कॉलेज, पुणे, तर फाइन आर्ट्समध्ये एम. के. एस. एस. कॉलेज, रत्नागिरी विजयी ठरले.

समन्वयनाची धुरा डॉ. नितीन प्रभू तेंडुलकर व किरण गायकवाड यांनी सांभाळली. शहीद महाविद्यालयाचे समन्वयक म्हणून प्रा. अविनाश पालकर यांनी प्रभावी जबाबदारी पार पाडली. डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या मार्गदर्शनातून हा सांस्कृतिक सोहळा संस्मरणीय ठरला. (Shahid Champion)

स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य प्रा. प्रशांत पालकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शुभांगी भारमल व प्रा. तेजस्विनी परबकर यांनी केले तर आभार प्रा. दिग्विजय कुंभार यांनी मानले.

उपप्राचार्य सागर शेटगे, विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व उत्साही विद्यार्थिनींच्या उपस्थितीने महोत्सव संस्मरणीय ठरला.

संस्कृतीचा रंगतदार जल्लोष, कलांची उत्स्फूर्त अभिव्यक्ती आणि ‘शहीद’च्या कर्तृत्वाने नटलेला हा युवा महोत्सव, उपस्थितांना अविस्मरणीय अनुभव देऊन गेला.

Related posts

मुक्तीचे जीवनगाणे…. ब्रिजेट बार्दो, डॉ. रुथ लॉरेन्स

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी

भारतीय गणराज्याच्या निर्मात्या