ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचे निधन

Senior journalist Pratap Asbe has passed away

मुंबई : प्रतिनिधी : ज्येष्ठ, निर्भिड आणि अभ्यासू पत्रकार प्रताप आसबे (वय ७६) यांचे बुधवारी आकस्मित निधन झाले. मुंबईतील हिंदूजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या गुरुवारी (दि.२९) सकाळी ११ वाजता दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (Senior journalist Pratap Asbe has passed away)

महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांनी प्रदीर्घ पत्रकारिता केली. मुळचे सोलापूरचे असलेल्या प्रताप आसबे यांची कर्मभूमी मात्र मुंबई होती. ‘महाराष्ट्र देशी’ हे त्यांचे सदर राजकारणावर सडेतोड लिखान करणारे असल्याने वाचकांकडून त्याला भरभरुन प्रतिसाद मिळाला. धुळ्यातील धर्मभास्कर वाघ प्रकरण त्यांनी उजेडात आणले. राज्यातील अनेक मंत्री आणि नेत्यांशी त्यांचे संबध होते. महाराष्ट्र टाइम्समध्ये अनेक राजकीय ब ब्रेकिंग न्यूज त्यांनी देऊन खळबळ उडवली होती. (Senior journalist Pratap Asbe has passed away)

पत्रकारिता करत असताना आसबे हे युवक क्रांतीदल आणि गिरणी कामगार सभेचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. कामगार आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांची लेखणी कायम कार्यरत रहायची. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीत त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. बाबरी मशिद खटल्यात ते साक्षीदार होते. अयोध्यातील कारसेवेच्या वृत्तांकणासाठी ते अयोध्येला गेले होते. पहिला दिनू रणदिवे पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. (Senior journalist Pratap Asbe has passed away)

Related posts

गोकुळमध्ये मतचोरी; राहूल गांधीची भाजपवर टीका

गोकुळ’मध्ये सत्तांतर रोखण्यासाठी  आणलेला अध्यादेश बेकायदेशीर

एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये दिवाळी भेट : प्रताप सरनाईक