नवसंकल्पना राबवणाऱ्या ऋतुराज यांना साथ द्या : सतेज पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण मतदार संघाच्या विकासासाठी नवनवीन संकल्पना घेऊन आमदार ऋतुराज पाटील काम करत आहेत. मतदार संघाचा सर्वांगीण विकास करणाऱ्या ऋतुराज पाटील यांना साथ द्या, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. (Satej Patil)

वसगडे, सांगवडे येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. चंद्रकांत कांचळे म्हणाले, आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील हे जनसेवेसाठी सदैव तत्पर आहेत. आ. ऋतुराज पाटील यांच्या पाठीशी आम्ही  ठामपणे उभे आहोत. विजय पाटील म्हणाले, आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगवडेत कोट्यवधीची कामे केली असून विकासाची ही गंगा अशीच पुढे सुरु ठेवण्यासाठी त्यांना विजयी करुया. वैशाली गवळी, सुकुमार जगनाडे, संदीप कामत, नानासो पाटील, सुहास बरगले, राजेंद्र सुर्यवंशी, अशोक साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वंदना पाटील, शोभा राजमाने, भुजगोंडा पाटील, बाळासाहेब उपाध्ये, सुनील पाटील, विनायक शिर्के, सर्जेराव बौरांजे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी