संजय मल्होत्रा आरबीआयचे २६वे गव्हर्नर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारने संजय मल्होत्रा यांची आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती केली आहे. आरबीआयचे विद्यामान गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा कार्यकाळ १० डिसेंबर रोजी संपत आहे. यामुळे मल्होत्रा यांची आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संजय मल्होत्रा आरबीआयचे २६ वे गव्हर्नर असतील. त्यांची नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. (Sanjay Malhotra)

कोण आहेत संजय मल्होत्रा?

संजय मल्होत्रा ​​हे राजस्थान केडरचे १९९० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ऊर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते. नोव्हेंबर २०२० मध्ये आरईसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक झाले. २०२२ साली संजय मल्होत्रा ​​यांची केंद्र सरकारने आरबीआयचे संचालक म्हणून नामनिर्देशन केले.

हेही वाचा :

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले