Sambhajiraje demand : रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा

Sambhajiraje demand

Sambhajiraje demand

कोल्हापूर : प्रतिनिधी : किल्ले रायगडावरील शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत असलेल्या कथित वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. संभाजीराजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली आहे. संभाजीराजे हे रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. (Sambhajiraje demand)

माजी खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही.  (Sambhajiraje demand)

भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे. (Sambhajiraje demand)

समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे. (Sambhajiraje demand)

कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरची वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. ३१ मे २०२५ अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे, याकरिता मुख्यमंत्री महोदयांकडे पत्र लिहून मागणी केली आहे. (Sambhajiraje demand)

भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस १०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे. (Sambhajiraje demand)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाची प्रत पाठवण्यात आली आहे. तसेच महासंचालक, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नवी दिल्ली आणि प्रादेशिक संचालक, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, मुंबई यांनाही वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याचे निवेदन पाठवले आहे. (Sambhajiraje demand)

हेही वाचा :

विधानसभेत सगळेच खोक्याभाई!

न्यायाधीश निवासस्थानातील ‘जळीत नोटा’ चौकशी अहवाल प्रसिद्ध

मोबाईलवर मॅच बघत शिवनेरी बस चालवली

Related posts

Mitra

Mitra : सांगली, कोल्हापुरातील पूर नियंत्रणासाठी साठवण तलाव बांधा

Pak suspended Simla agreement

Pak suspended Simla agreement: पाकिस्ताकडून सिमला करार रद्द

Jewellery theft

Jewellery theft : निवृत्त शिक्षिकेच्या घरात तीस तोळे दागिने चोरीस