saint tukaram chair : तुकोबांच्या निवडक अभंगांना स्वरसाज

saint tukaram chair

कोल्हापूर : प्रतिनिधी :  महाराष्ट्राची वारकरी परंपरा आपल्या बहुप्रसवी वाणीने समृद्ध करणारे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या आजवर संगीतबद्ध न झालेले काही निवडक अभंग शिवाजी विद्यापीठाने संगीतबद्ध केले आहेत. ही कामगिरी शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाने केली आहे. विद्यापीठाच्या ६१व्या दीक्षान्त समारंभानिमित्त, १६ जानेवारीला सकाळी ११ वाजता विशेष सांस्कृतिक कार्यक्रमात या चित्रफीत-ध्वनीमुद्रणाचे प्रकाशन  होणार आहे. यावेळी  गायिका डॉ. साधना शिलेदार यांचे गायनही होणार आहे. (saint tukaram chair)

शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी या संदर्भात माहिती दिली. संत तुकाराम यांच्या अनेक अभंगरचनांवर अनेक नामवंत गायक-गायिकांनी स्वरसाज चढविला आहे. त्या मोठ्या प्रमाणात लोकप्रियही आहेत. मात्र, त्याचवेळी तुकाराम महाराजांच्या अनेक रचनांवर अद्याप सांगीतिक स्वरसाज चढविण्यात आलेला नाही. अशा दहा निवडक अभंगरचना  स्वरबद्ध करण्याचे काम अध्यासनामार्फत करण्यात आले. सुप्रसिद्ध गायिका डॉ. साधना शिलेदार यांनी त्यांचे गायन केले आहे. त्यांच्यासह श्रीकांत पिसे, राहुल एकबोटे, संकेत नागपूरकर, दीपश्री पाटील या संगीतकारांनी या रचना संगीतबद्ध केल्या आहेत. ‘तुकोबांची अभंगवाणी’ या नावाने असलेल्या या चित्रफीत आणि ध्वनीमुद्रणाचे प्रकाशन येत्या १६ जानेवारी रोजी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.(saint tukaram chair)

विद्यापीठाच्या  दीक्षान्त समारंभाचे औचित्य साधून १६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता संत तुकाराम अध्यासन आणि संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित या कार्यक्रमात डॉ. साधना शिलेदार यांचा विशेष गायन कार्यक्रम होणार आहे. या अभंगवाणीमधील रचना सर्वप्रथम त्यांच्या तोंडूनच ऐकण्याची संधी रसिकांना या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन सांगोल्याचे ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर करणार आहेत.

कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे उपस्थित राहणार आहेत. रसिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत तुकाराम यांच्या अभंगांच्या नवरचनांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन डॉ. मोरे यांच्यासह डॉ. रणधीर शिंदे आणि संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी केले आहे.

हेही वाचा :

 लढणाऱ्या सर्व भारतीयांना परत पाठवा

Related posts

Lifetime Achievement : श्रीकांत डिग्रजकर यांना ‘जीवन गौरव’

Book Publication: अदानी मुद्द्यावरून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न

Urdu Carnival : कुराणाची छोटी आणि मराठी प्रतही पाहता येणार