Russia Ukraine News : रशियाच्या आण्विक संरक्षण दलाच्या प्रभारी प्रमुखाची हत्या

मॉस्को : रशियाच्या आण्विक संरक्षण दलाचे प्रभारी प्रमुख लेफ्टनंट जनरल इगोर किरिलोव्ह यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे रशियाच्या संरक्षण दलाला हादरा बसला आहे. किरिलोव्ह अपार्टबाहेर आले त्यावेळी इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लपवलेल्या बॉम्बचा स्फोट करण्यात आला. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे रशियाच्या तपास यंत्रणांनी म्हटले आहे. (Russia Ukraine News)

किरिलोव्ह रशियन फेडरेशनच्या सशस्त्र दलांच्या किरणोत्सर्गी, रासायनिक आणि जैविक संरक्षण दलांचे प्रमुख होते. त्यांच्यासह त्यांच्या सहायकांचा या घटनेत मृत्यू झाला. रशियाच्या ‘तास’ या वृत्तसंस्थेने अधिकृत सूत्राचा हवाला देत स्फोटक उपकरणाची क्षमता सुमारे तीनशे ग्रॅम होती. किरणोत्सर्गी, रासायनिक आणि जैविक आपत्तीच्या परिस्थितीत रशियाचे किरणोत्सर्गी, रासायनिक आणि जैविक संरक्षण दल हे विशेष दल काम करते. त्याचे किरिलोव्ह हे प्रमुख होते.

‘अल जजिरा’ने दिलेल्या वृत्तानुसार, घटनास्थळाची छायाचित्रे रशियन टेलिग्राम चॅनेलवर पोस्ट करण्यात आली आहेत. तेथे इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ इमारतीच्या अवशेषाचा ढिगारा पडला आहे. तेथेच बर्फात रक्ताने माखलेल्या स्थितीत या दोघांचे मृतदेह पडले होते. येथील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता आहे. त्याबाबत येथील रहिवाशी सातत्याने तक्रारी करत होते. घटना घडली त्या ठिकाणचे कॅमेरे काम करीत नव्हते. या निवासी संकुलातील धातू शोध यंत्रणाही बंद आहे. (Russia Ukraine News)

बंदी घातलेल्या रासायनिक शस्त्रांच्या कथित वापराचा आरोप युक्रेनच्या सरकारी वकिलांनी सोमवारी किरिलोव्ह यांच्यावर केला होता. युक्रेनच्या सुरक्षा सेवेच्या हवाल्याने कीव इंडिपेंडंटने हे वृत्त दिले होते. तथापि, रशियाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

हेही वाचा :

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले