राजू शेट्टी झाले मुंबईकर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मुंबई मध्ये आपले स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडा कडून अशा अनेक लोकांची स्वप्ने पूर्ण होत आहेत. आतापर्यंत २०३० लोकांना मुंबईत घर मिळाले आहे. यावर्षी म्हाडा घरांच्या सोडतीत हातकणंगले मतदार संघाचे माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचं मुंबईतल्या घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे. राजू शेट्टी यांनी खासदार कोट्यातून मुंबईत घर लागलं आहे. (Raju Shetti)

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाने मुंबईतल्या २०३० घरांसाठी एकूण १ लाख १३ हजार लोकांनी अर्ज केले होते. यातल्या २०३० भाग्यवान लोकांना सोडतीत घरे लागली आहेत. ज्या लोकांना मुंबईत घरं लागली नाही त्यांनीही गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यंनी लवकरच आणखी एक लॉटरी जाहीर केली जाणार असल्याची खुशखबर दिली आहे. खासदार कोट्यातील तीन घरांसाठी राजू शेट्टी यांनी केलेला एकच अर्ज प्राप्त झाला. त्यामुळे म्हाडाच्या लॉटरीची घोषणा होण्यापूर्वीच राजू शेट्टी यांच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं होतं. मंगळवारी याची औपचारिक घोषणा करण्यात आली.

राजू शेट्टी झाले मुंबईकर

म्हाडाचं घर लागल्याने राजू शेट्टी आता मुंबईकर होणार आहेत. मुंबईतल्या पवई भागात राजू शेट्टींचं घर आहे. या घराची किंमत १ कोटी २० लाख रुपये इतकी आहे. आपली आणि कोल्हापूरातून मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या माझ्या कार्यकर्त्यांची राहण्याची सोय होणार असल्याचा आनंद अधिक आहे, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे. (Raju Shetti)

गोरेगावमधील दोन घरांसाठी एकूण २७ कलाकारांनी अर्ज केलं होते. यापैकी एक घर माझा होशील ना मालिका फेम अभिनेत्री गौतमी देशपांडेला मिळालं आहे.महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता गौरव मोरे आणि निखिल बने तसंच मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरे यांनाही घरं लागली आहेत. मुंबईतल्या विक्रोळी इथल्या कन्नमवार नगरममध्ये निखिल बनेला घर लागलं आहे. तर पवई परिरसातील उच्चभ्रू गटात गौरव मोरे आणि शिव ठाकरे यांना घरं लागली आहेत. या घरांची किंमत १ कोटी ८० लाख इतकी आहे.

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ