Rahul attacks Bhagwat : भागवतांचे वक्तव्य देशद्रोही

rahul gandhi

नवी दिल्ली : सरसंघचालक मोहन भागवत वायफळ बडबड करीत असतात. त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामाबाबत केलेले वक्तव्यही तसेच आहे. असे वक्तव्य त्यांनी दुसऱ्या एखाद्या देशात केले असते तर त्यांना अटक झाली असती, असा हल्लाबोल लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी केला. भागवतांनी केलेले वक्तव्य देशद्रोही आहे, असा आरोपही त्यांनी केला.(Rahul attacks Bhagwat)

काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी राहुल गांधी यांनी भागवत यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. काँग्रेसचे हे मुख्यालय इंदिरा भवन नावाने ओळखले जाणार आहे.

ते म्हणाले, भागवत म्हणाले होते की रामलल्लाची मूर्ती ज्या दिवशी राम मंदिरात प्रतिष्ठापना झाली ती तिथी उत्सव म्हणून साजरी करावी. कारण त्यानंतर देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले. यावरून त्यांचे स्वातंत्र्यलढ्याबाबत त्यांचे विचार काय आहेत हे लक्षात येते. त्यांनी केलेले वक्तव्य हा देशद्रोह आहे. त्यांच्या म्हणण्याचा सरळ अर्थ हाच होतो की राज्यघटनेचे काहीच औचित्य नाही. इंग्रजांविरोधात जी लढाई देशाने केली त्याला काही अर्थ नाही.(Rahul attacks Bhagwat)

भागवत जाहीररित्या असे वक्तव्य करतात. दुसऱ्या एखाद्या देशात त्यांनी असे वक्तव्य केले असतं तर त्यांना अटक झाली असती. त्यांच्यावर खटला भरवला गेला असता. १९४७ मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळाले नाही असे वक्तव्य करणे हा देशातल्या प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे. तो भागवत यांनी केला आहे. त्यांची असली वायफळ बडबड ऐकणे बंद करण्याची वेळ आली आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

आमचा विचार संविधान

आमचा विचार हा संविधान हा आहे, याचा पुनरुच्चार करून राहुल गांधी म्हणाले, दुसरीकडे संघाचा विचार नेमका त्याच्या उलट आहे. देशात दोन विचारांतील द्वंद्व सुरू आहे. दोन विचारधारांमधील ही लढाई आहे. देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नाही, हे सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य भारतीयांचा अपमान करणारे असल्याचे आहे. त्यांची ही विचारधारा काँग्रेस पक्षच रोखू शकतो, हे लक्षात ठेवा असेही राहुल गांधी म्हणाले.(Rahul attacks Bhagwat)

निवडणूक आयोग बांधील

आपल्या देशात तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोपही राहुल गांधी यावेळी पुन्हा एकदा केला. ईडी, सीबीआय यांना एकच काम दिले जाते ते म्हणजे विरोधी पक्षातील नेत्यांना घेरा आणि त्यांना तुरुंगात पाठवा. निवडणूक आयोग जनतेला बांधील आहे. आयोगाकडे महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही निवडणुकीची आम्ही मागतो आहोत ती त्यांनी दिली पाहिजे, अशी आग्रही मागणीही राहुल गांधींनी केली.

हेही वाचा :

भाजप प्रदेशाध्यक्षावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा

 

Related posts

President Arrests : दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांना भल्या पहाटे अटक

Gang Rape : भाजप प्रदेशाध्यक्षावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा

Pawar criticises Shah : ‘त्यांना’ कधी तडीपार केले नव्हते!