पुष्पा २, वर्ल्डवाईड ५८९.६० कोटीचा व्यवसाय

Pushpa 2 Collection

मुंबई : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना या सुपरहिट जोडीचा पुष्पा २: द रुल हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर जोरदार कमाई करत असून हिंदी भाषेतील या चित्रपटाने तिसऱ्यादिवशी २०५ कोटींचा व्यवसाय केला आहे. तर अन्य सहा भाषातील या फिल्मने ३८७.९५ कोटी तर वर्ल्डवाईड ५९८ कोटी ९० रुपयांची कमाई केली आहे. हिंदी भाषेतील या चित्रपटाने शाहरुख खानच्या जवान आणि एनिलमल या चित्रपटाचे रेकॉर्ड तोडले आहेत. (Pushpa 2 Collection)

तीन दिवसात पुष्पा टू ने हिंदी भाषेतील चित्रपटाने २०५ कोटींचा व्यवसाय केला.  यापूर्वी शाहरुखनच्या जवान चित्रपटाने १८०.४५ कोटीचा व्यवसाय केला होता. अॅनिमलने १७६.१८ कोटी, पठाण चित्रपटाने १६१, टायगर थ्री ने १४४.५०, केजीएफ टू हिंदी चित्रपटाने १४३.६४ कोटीचा व्यवसाय केला होता. स्त्री टू ने १३६.४० कोटी, गदर टू ने १३४,८८ कोटी, बाहुबली टू हिंदी चित्रपटाने १२८ कोटी तर संजू चित्रपटाने १२०.०६ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

पुष्पा टू चित्रपटाने पहिल्या दिवशी ७२ कोटी रुपयांचा तर दुसऱ्या दिवशी ५९ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी व्यवसाय कमी झाला असला तरी पहिल्या दिवसाच्या तुलनेत तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने ७४ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. तीन दिवसात २०५ कोटींचा व्यवसाय करुन बॉक्स ऑफीसवर धुमधुडाका केला आहे.

चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या अप्रतिम अभिनय करुन पब्लिकला जाम खूष केले. चित्रपटातील अक्शन जबरदस्त आहेत. अल्लू अर्जुनच्या डायलॉगला पब्लिक पसंती देत आहे. चित्रपटात काही गोष्टी कमी असल्या तरी सिनेफोटोग्राफीवर पब्लिक जाम खूष आहे. (Pushpa 2 Collection)

हेही वाचा :

Related posts

Juna Budhvar win title

Juna Budhvar win title : ‘जुना बुधवार’ चे पहिलेवहिले विजेतेपद

Tiger death

Tiger death : चार महिन्यांत वीस वाघांचा मृत्यू

ED office

ED office : ईडी कार्यालय इमारतीला आग