मतदान केंद्रावर मोबाइल वापरास मनाई

मुंबई; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर मोबाईलचा दुरुपयोग होईल, असा दावा निवडणूक आयोगाने केला होता. उच्च न्यायालयाने त्याला मान्यता देताना मतदान केंद्रावर मोबाईल नेण्याची परवानगी नाकारली आहे. तसेच याबाबत आयोगाने काढलेले परिपत्रक योग्यच आहे असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरापर्यंत मोबाईल वापरण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक तसेच वयोवृद्ध महिलांना मतदान केंद्रावर नातेवाईकांशी संपर्क साधता येत नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय होते. तसेच ओळखपत्र व इतर कागदपत्रे मतदान केंद्रावर नेणे अडचणीचे असल्यामुळे ‘डिजी लॉकर’ सेवेचा वापर करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी अॅड. उजाला यादव यांनी याचिकेव्दारे केली होती. याबाबत मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. आयोगाच्यावतीने ज्येष्ठ विधीज्ञ  आशुतोष कुंभकोनी यांनी युक्तिवाद करताना निवडणुका पारदर्शक, निष्पक्षपणे व सुरळीत पार पाडण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला.

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ