नवी दिल्ली : बिहारमध्ये सत्ताधारी भाजपला चांगलाच फटका बसला. बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार नीरजकुमार यांचा पराभव करुन जन सुराज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी विजय मिळवला. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी विधानसभेचा राजीनामा दिल्यानंतर पोटनिवडणूक लागली आहे. तब्बल तीस वर्षाचा भाजपचा बालेकिल्ला प्रशांत किशोर यांनी नेस्तानाबूत केला. प्रशांत किशोर हे निवडणुकीतील रणनितीकार समजले जातात. गुजरातमधील पोटनिवडणुकीत भाजपने तर मध्य प्रदेशात काँग्रेसने बाजी मारली. (Prashant Kishor of Jan Suraaj victorious in Bihar)
बांकीपूरचा भाजपचा गड उद्धवस्त
बांकीपूर विधानसभा पोटनिवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत जनसुराज, सत्ताधारी भाजप आणि विरोधी आरजेडी यांच्यात तिरंगी लढत होती. पण सुरुवातीपासून आघाडीवर असलेल्या प्रशांत किशोर यांनी निवडणूक जिंकून दाखवली. ३१ फेऱ्यानंतर प्रशांत किशोर यांना ६३ हजार २०३ मते मिळाली असून भाजपच्या नीरज कुमार यांना ४४ हजार २५० मते मिळाली आहेत. प्रशांत किशोर यांनी १८ हजार ९५३ मतांनी आघाडी घेतली आहे. आरजेडीच्या रेखा कुमारी यांनी १४ हजार ८५ मते मिळवली आहेत. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी जन सुराज्य पक्षाची स्थापना केली होती. पण त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला होता. पण पोटनिवडणुकीत विजय मिळवत प्रशांत किशोर यांनी पराभवाचा डाग पुसुन काढला. (Prashant Kishor of Jan Suraaj victorious in Bihar)
गुजरातमध्ये भाजपचा झेंडा
मोदी शाह यांच्या होमग्राऊंडवरील गुजरातमधील मांजलपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली. भाजपचे उमेदार सतीश पटेल यांनी निवडणूक जिंकली. पटेल यांना ५५ हजार ४८१ तर काँग्रेसचे उमेदवार भिकाभाई राबरी यांना २४ हजार ८५१ मते मिळाली. पटेल यांनी तब्बल ३० हजार ६३० मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली. (Prashant Kishor of Jan Suraaj victorious in Bihar)
मध्यप्रदेशात काँग्रेस विजयी
दातिया विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव करत काँग्रेसने निवडणूक जिंकली. सुरवातीला पिछाडीवर असलेल्या काँग्रेसचे उमेदवार घनश्याम सिंह यांनी नंतर आघाडी घेतली. ते ६०१६ मताधिक्य मिळवून विजयी झाले. १५ फेऱ्यानंतर झालेल्या मतमोजणीत काँग्रेसचे घनश्याम सिंह यांना ६६ हजार ७५७ मते मिळाली तर भाजपच्या आशुतोष तिवारी यांना ६० हजार ७४१ मते मिळाली. (Prashant Kishor of Jan Suraaj victorious in Bihar)