Home » Blog » राज ठाकरेकडून मोदी, चंद्रकांतदादांची चंपी

राज ठाकरेकडून मोदी, चंद्रकांतदादांची चंपी

by प्रतिनिधी
0 comments
Raj Thackeray criticizes Modi and Chandrakant-dada

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या विसाव्या वर्धापन दिन सोहळ्यात मुंबईत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत चांगलीच चंपी केली. (Raj Thackeray criticizes Modi and Chandrakant-dada)

चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट बघायचे आहेत

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दगड आणि फिंगरप्रिंटस या इशाऱ्याची चांगलीच खिल्ली उडवली. ते म्हणाले, आम्ही लहान असताना आमचे आईवडील रात्री झोपताना तेल लावत जा असे सांगायचे. त्यामुळे बुद्धी तल्लख होती. पण एका माणसाने डोक्यावर तेल चोपडले तरी त्याला बुद्धी आली नाही. जे आपले शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री आहेत. मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट बघायचे आहेत. कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावे म्हणून त्यांना पुण्यात पाठवले. पुणे शिक्षणाचे माहेरघर आहे. तिथेही काही झाली नाही. असे शिक्षणमंत्री म्हटल्यांवर जेन झींचा पारा चढणारच. अशी माणसे आमच्या नशिबी आणून ठेवली आहेत अशी टीका केली. (Raj Thackeray criticizes Modi and Chandrakant-dada)

भाजपच्या ट्रोलने जे पेरले तेच आज उगवले

पंतप्रधान मोदींवर राज ठाकरे यांनी शरसंधान केले. ते म्हणाले, मी मोदींचा व्हिडिओ पाहिला. कोणाचाहीबाबत अशा प्रकारची खालच्या थराची भाषा वापरली जाऊ नये हे मला मान्य आहे. पण मला पंतप्रधानांना सांगायचे आहे की तुमच्या पक्षातील लोकांनाही हे सांगा. महात्मा गांधी, पंडीत नेहरु, इंदिरा गांधीपासून आमच्यापर्यंत तुमची ट्रोल करणारे लोक प्रत्येक राज्यात बसले आहेत. ते कोणत्या भाषेत बोलतात?  पंतप्रधानांनी सर्वप्रथम ते बंद करावे. गेल्या १२ वर्षात भाजपच्या ट्रोल टीमने जे पेरले तेच आज उगवले असा टोलाही त्यांनी लगावला. (Raj Thackeray criticizes Modi and Chandrakant-dada)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!