Home » Blog » अस्मिता, हर्षला सुवर्ण, नीरज,यामिनीला रौप्य, यशवीर, शंकरला कास्य

अस्मिता, हर्षला सुवर्ण, नीरज,यामिनीला रौप्य, यशवीर, शंकरला कास्य

by प्रतिनिधी
0 comments
India wins two gold medals in judo

नवी दिल्ली : ग्लासगो कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताने दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन ब्राँझपदके पटकावली. ज्युदोमध्ये अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी सुवर्णपदक पटकावत दैदिप्यमान कामगिरी केली. यामिनी मौर्यला रौप्य पदक मिळाले. ऑलिपिंक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राला भालाफेकमध्ये रौप्य पदकांवर समाधान मानावे लागले पण याच प्रकरात भारताच्या यशवीर सिंगने ब्राँझ् पदक मिळवले. डेकॅथलॉन प्रकारात शंकरने ब्राँझ पदक पटकावले, नवव्या दिवशी भारताच्या नावावर सहा पदकांची नोंद झाली आहे. या स्पर्धेत भारत ५ सुवर्ण, १२ रौप्य, सहा ब्राँझ पदकासह २३ पदक मिळवून १० व्या स्थानावर आहे. (India wins two gold medals in judo)

ज्युदोत सुवर्णपदक मिळवण्याची भारताची पाहिलीच वेळ

ज्युदोमध्ये अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी भारताचा दिवस गाजवला. भारताने ज्युदोमध्ये दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावले. ज्युदोमध्ये सुवर्णपदक मिळवण्याची भारताची पाहिलीच वेळ आहे. अस्मिता डे ने ४८ किलो गटात अंतिम फेरीत कॅनडाच्या हेडी क्वाचचा २-१ असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले. पुरुषांच्या ६० किलो वजन गटात हर्ष सिंगने ऑस्ट्रेलियाच्या जोशुआ कॅट्झचा १०-० असा पराभव करत सुवर्ण पदक पटकावले. ५७ किलो गटात यामिनी मौर्यला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. (India wins two gold medals in judo)

नीरज चोप्राला रौप्य, यशवीर सिंगला ब्राँझ

भालाफेकमध्ये संपूर्ण भारताच्या नजरा नीरज चोप्रावर होत्या. अंतिम फेरीत नीरज चौप्राने पहिल्या प्रयत्नात ८०.९७ मीटर, दुसऱ्या प्रयत्नात ८५.८३, तिसऱ्या प्रयत्नात ८१.२९, चौथ्या प्रयत्नात ८०.७२ मीटर लांब भाला फेकला. पाचव्या आणि सहाव्या प्रयत्नात भाला ८० मीटरपेक्षा कमी अंतरावर पडलेला पाहून त्याने आपले थ्रो रद्द केले. दुसऱ्या प्रयत्नात ८५.८३ मीटर भाला फेकल्याच्या आधारावर त्याला रौप्य पदक जिंकले. याच प्रकरणात भारताच्या यशवीर सिंगने ८५.४१ मीटर भाला फेकून ब्राँझ पदक मिळवले.

डॅकॅथलॉनमध्ये शंकरने इतिहास घडवला.

डेकॅथलॉन या प्रकारात भारताने पहिल्यांदाच पदक जिंकून इतिहास रचला. भारताचा अॅथलिट, तेजस्विन शंकरने ७.९७६ गुणांसह ब्राँझ पदकावर नाव कोरले. अॅथलिटिक्समधील डेकाथलॉन ही सर्वात कठीण स्पर्धा मानली जाते. या प्रकरणात दहा वेगवेगळ्या खेळांचा समावेश असतो.  (India wins two gold medals in judo)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!