Home » Blog » Sports Hostel : विद्यार्थ्यांच्या हस्ते  शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा वसतिगृहाचे उद्घाटन

Sports Hostel : विद्यार्थ्यांच्या हस्ते  शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा वसतिगृहाचे उद्घाटन

by प्रतिनिधी
0 comments
Sports Hostel

कोल्हापूर  : प्रतिनिधी :  शिवाजी विद्यापीठात आज क्रीडा विभागासाठीच्या स्वतंत्र वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते नियोजित असलेले हे उद्घाटन करण्याचा मान त्यांनी क्रीडा अधिविभागाच्या तीन विद्यार्थ्यांना दिला. किरण लोहार, प्रतीक पाटील आणि रोहन दिवटे या विद्यार्थ्यांच्या हस्ते वसतिगृह इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. (Sports Hostel)

विद्यापीठाचे क्रीडा वसतिगृह तळमजला अधिक तीन मजले असे प्रस्तावित असून पहिल्या टप्प्यात तळमजल्याचे ११६४८.७७ चौरस फूट क्षेत्रफळाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये १६ कक्षांसह एक विद्युत कक्ष, कार्यालय, उपाहारगृह आणि भोजन कक्ष यांची सुविधा आहे.

या वसतिगृहामुळे क्रीडा शिबिरे, प्रशिक्षण तसेच विविध स्पर्धांसाठी विद्यापीठात येणाऱ्या क्रीडापटूंच्या निवासासाठी कायमस्वरुपी सुविधा उभारण्याचा मानस प्रत्यक्षात साकारल्याबद्दल कुलगुरू डॉ. शिर्के यांनी समाधान व्यक्त केले. क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी स्वागत करून वसतिगृहाची माहिती दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता हेमा जोशी, कंत्राटदार सतीश घोरपडे, मुंबईच्या साई प्रोजेक्ट कन्सल्टंट या आर्किटेक्ट कंपनीचे संदीप शेखर, अष्टविनायक इलेक्ट्रीकल्सचे राम बुधाजी खन्नुकर यांचा कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (Sports Hostel)

कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. गिरीष कुलकर्णी, डॉ. राजेंद्र रायकर, सुभाष पवार, सुचय खोपडे, अभियांत्रिकी विभागाचे उपकुलसचिव रणजीत यादव, प्रा. महेश साळुंखे,  विजय पोवार, वैभव आर्डेकर, विद्युत अभियंता अमित कांबळे, शिवकुमार ध्याडे यांच्यासह क्रीडा अधिविभागाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. किरण पाटील यांनी आभार मानले. (Sports Hostel)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00