छत्रपती संभाजीनगर : अभिजीत दीपकेंच्या वडिलांनी मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी कुठुन पैसा पुरवला असा प्रश्न उपस्थित झाल्यावर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला आहे. पंतप्रधान मोदी यांनी त्यांची डिग्री सार्वजनिक करावी. मी माझ्या अमेरिकेतील शिक्षणाला मिळालेल्या रक्कमेची माहिती देतो असे आव्हान दिले आहे. (Modi should make his degree public)
परदेशातील शिक्षणासाठी निधी कसा पुरवला?
अभिजीत दीपके यांचे वडिल हे राज्य सरकारचे निवृत्त कर्मचारी आहेत. ते एमआयडीसीमध्ये कनिष्ठ अभियंता होते. त्यांनी आपल्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी निधी कसा पुरवला असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तसेच अभिजीतचे वडील भगवान दिपके यांच्या वडिलांच्या मालमत्तेची चौकशीची मागणी करण्यात आली आहे. सुरतेतील आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सीजेपीच्या आंदोलकांसाठी जाहीर केलेल्या एक कोटी रुपयांच्या कायदेशीर सरंक्षण निधीची चौकशी करण्याची मागणी केली. (Modi should make his degree public)
एज्युकेशन लोन, स्कॉलरशिप लेटर दाखवण्यास तयार
आपल्यावर झालेल्या आरोपाचा अभिजीत दीपकेंने खुलासा केला. माझे एज्युकेशन क्वालिफिकेशनवर आहे. मी बॉस्टनला शिक्षण घेऊ शकलो त्यासाठी मी स्कॉलरशिप लेटर आहे एज्युकेशन लोनचे लेटर दाखवायला तयार आहे. त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची डिग्री सार्वजनिक करावी. त्यांनी डिग्री सार्वजनिक केली मी माझे स्कॉलरशिप लेटर आणि एज्युकेशन लेटर सार्वजनिक करण्यास तयार आहे. (Modi should make his degree public)
मोदींनी डिग्री सार्वजनिक करावी
जेव्हा जेव्हा सरकारच्या विरोधात आवाज उठवला जातो तेव्हा त्यांच्या विरोधात ही मंडळी त्याच्या घरी ईडी आणि सीबीआय पाठवतात. ईडी आणि सीबीआय पाठवली तर मी त्यांना माझं एज्युकेशन लोनचं आणि स्कॉलरशिपचं लेटर दाखवयाला तयार आहे. पण पंतप्रधान मोदी तुम्ही जर ईडीला पाठवत असाल तर ईडीसोबत तुमची डिग्री सुद्धा पाठवला. किंवा तुमची डिग्री सार्वजनिक करा. त्यानंतर माझी डिग्री सार्वजनिक करतो. असे आव्हान दीपके यांनी दिले आहे. (Modi should make his degree public)