Home » Blog » महिला कुस्तीगीर लैगिंक छळाच्या गुन्ह्यातून ब्रिजभूषण सिंहांची निर्दोष मुक्तता

महिला कुस्तीगीर लैगिंक छळाच्या गुन्ह्यातून ब्रिजभूषण सिंहांची निर्दोष मुक्तता

by प्रतिनिधी
0 comments
Brijbhushan Singh's acquittal

नवी दिल्ल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण सिंह यांना महिला कुस्तीगीर लैगिंक छळाच्या गुन्ह्यातून दिल्लीच्या राऊझ एव्हेन्यू न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या गुन्ह्यातील सह आरोपी कुस्तीगीर महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. ब्रिजमोहन सिंग यांच्यावर विरोधी देशातील प्रमुख आंतरराष्ट्रीय पातळीवरील पदक विजेत्या महिला कुस्तीगीरांनी जंतरमंतरवर आंदोलन केले होते. (Brijbhushan Singh’s acquittal)

११३३ दिवसांत १२७ सुनावण्या

 अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अश्विनी पनवार यांच्या न्यायालयाने आज सोमवारी हा निकाल दिला. न्यायालयात इन कॅमेरा ही सुनावणी झाली.  सहा महिला पैलवानांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैगिंक छळाचे गंभीर आरोप केले होते. ११३३ दिवसांमध्ये १२७ सुनावण्या झाल्या.  त्यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. १५ जून २०२३ मध्ये १५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. १० मे २०२४ मध्ये ट्रायल कोर्टाने महिला पैलवानांच्या तक्रारीनंतर ब्रिजमोहन यांच्याविरोधात लैगिंक छळ आणि विनयभंगाचे आरोप निश्चित केले होते. एका अल्पवयीन महिला पैलवानोही ब्रिजमोहन यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर तिने आपली तक्रार मागे घेतली. (Brijbhushan Singh’s acquittal)

जंतरमंतरवर महिनाभर आंदोलन

दिल्लीतील जंतरमंतरवर देशातील आघाडीच्या महिला पैलवानांनी महिनाभर तीव्र आंदोलन केले होते. पुरुष मल्लांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.  हे आंदोलन देशात गाजले होते. पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढले होते. तरीही महिला पैलवान मागे हटल्या नव्हत्या. या आंदोलनामुळे भाजपला बॅकफूटवर जावे लागले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ब्रिजभूषण सिंह यांची उमेदवारी नाकारली होती. त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली होती. त्यांचा मुलगा लोकसभा निवडणुकीत निवडून आला.  (Brijbhushan Singh’s acquittal)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!