Home » Blog » ई-२०’ हे मोदी-गडकरी-फडणवीसांचा मोठा स्कॅम :  हर्षवर्धन सपकाळ

ई-२०’ हे मोदी-गडकरी-फडणवीसांचा मोठा स्कॅम :  हर्षवर्धन सपकाळ

by प्रतिनिधी
0 comments
'E-20' is a major scam involving Modi, Gadkari

जमीर काझी : मुंबई  : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून कोट्यवधीचा लाभ सरकारमधील काही लाभार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना झाला . पण त्यामुळे देशातील लाखो वाहनधारकांना नाहक त्रास होत आहे. हा एक मोठा घोटाळा असून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. या घोटाळ्याप्रश्नी  नितीन गडकरी यांचा राजानीमा घ्यावा ,अशी, मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी केली . (‘E-20’ is a major scam involving Modi, Gadkari)

इथेनॉलऐवजी पाणी मिसळल्याचा तक्रारी

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सपकाळ पुढे म्हणाले की, ‘ई-२० चा निर्णय २०३० ला लागू होणे अपेक्षित होते पण  सरकारमधील काही हितसंबंधित लोकांना लाभ देण्यासाठी घाईगडबडीत हा निर्णय लादण्यात आला. इथेनॉलऐवजी पेट्रोलमध्ये पाणी मिसळल्याच्या मोठ्या तक्रारी पुढे येत आहेत. आखातातील इंधन तुटवड्याचा फायदा उचलण्यासाठी मोठा घोटाळा केल्या, त्याचा पर्दाफाश झाला पाहिजे.  गडकरी यांच्या हट्टामुळे अनेक वाहने बंद पडली, इथेनॉलची वकिली करणारी व्यक्ती नितीन गडकरीच आहेत तसेच या घोटाळ्यात अनेक दलालही आहेत, त्यांचाही लवकरच पर्दाफाश होईल. पेट्रोलच्या किंमतीत पाणी विकून लोकांनी मोठी फसवणूक केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, असेही  सपकाळ यांनी सांगितले. (‘E-20’ is a major scam involving Modi, Gadkari)

आरएसएसचा अजेंडा राबवण्यासाठी फडणवीस दिल्लीला !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला पाठवण्याचे कारस्थान सुरु आहे, आणि त्यांनाही दिल्लीत जाण्याची घाई झालेली आहे. . महायुती सरकारमध्ये त्यांची विकेट काडण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. खरे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अमित शाह आहेत, फडणवीस शॅडो मुख्यमंत्री आहेत. भाजपा आरएसएसलाही त्यांचा अजेंडा राबवण्यासाठी रेशीम बागेचा खास माणूस हवा आहे व ते फडणवीस आहेत. मनुस्मृतीतील श्लोक टाकणे, चार्तुवर्ण व्यवस्था पुन्हा आणणे, संविधान व शिक्षणव्यवस्था बदलण्यासाठी फडणवीस हेच योग्य व्यक्ती आहेत, म्हणून दिल्लीत त्यांना शिक्षणमंत्री बनवण्याचा घाट घातला जात आहे, असेही काँग्रेस हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. (‘E-20’ is a major scam involving Modi, Gadkari)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!