- राकेश कायस्थ
द्रोणाचार्यांच्या शिष्यांमध्ये अर्जुन एकटाच असा होता, ज्याला फक्त पक्ष्याचा डोळा दिसत होता. लक्ष्य साधताना इतर राजकुमारांना संपूर्ण झाड दिसत होते, कुणाला झाडामागून वाहणारी नदीही दिसत होती, तर कुणाला त्या नदीच्या प्रवाहाचा आवाजही ऐकू येत होता. अर्जुन जगातील सर्वोत्तम धनुर्धर होता, म्हणून त्याला फक्त पक्ष्याचा डोळाच दिसत होता. (Modi shared second Instagram reel)
आणखी एक रील डागली
पंतप्रधान मोदींनाही गेल्या काही महिन्यांच्या गोंगाटात फक्त शिव्याच ऐकू येत आहेत—मोठमोठ्या, अश्लील शिव्या. प्रत्येक शब्दासोबत उभे राहणारे दृश्य आणि त्या दृश्यांसह आपल्या शयनकक्षात एकटे, अस्वस्थ पंतप्रधान. पंतप्रधानांच्या संयमाचा बांध फुटला. अगदी अर्जुनाने गांडीव उचलावे तसा त्यांनी मोबाईल उचलला आणि लक्ष्य साधत पक्ष्याच्या डोळ्यावर आणखी एक रील डागली. विश्वगुरू असेच करतात.
हेही वाचाः राज ठाकरेकडून मोदी, चंद्रकांतदादांची चंपी
गेल्या काही महिन्यांत या देशात अनेक प्रकारचे आवाज घुमत होते. नीटची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर आत्महत्या केलेल्या वीसहून अधिक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या आक्रोशाने देश दणाणून गेला होता. संपूर्ण देशाने तो आक्रोश ऐकला, पण पंतप्रधानांनी ऐकला नाही. (Modi shared second Instagram reel)
जंतर-मंतरवर रात्रंदिवस बसलेले तरुण पंतप्रधान आणि सरकारला काहीतरी सांगत होते. ते सांगत होते की, शिक्षणाची रचना उद्ध्वस्त करून विकसित भारत घडवता येणार नाही. विद्यार्थी सांगत होते की, ‘बनाना रिपब्लिक’सारखा शून्य उत्तरदायित्व असलेला देश बनवून तुम्ही भावी पिढ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहात. देशाच्या हितासाठी सरकारने जबाबदारी स्वीकारायला शिकले पाहिजे. संपूर्ण देशाने हे ऐकले, पण पंतप्रधानांनी ऐकले नाही.
पंतप्रधानांना शिव्या कोणी दिल्या?
२० जुलै रोजी देशातील तरुणांनी शांततेने संसदेकडे मोर्चा काढला. दिल्ली पोलिसांनी हा मोर्चा कोणत्याही मार्गाने हिंसक व्हावा, जेणेकरून तो चिरडण्याचे कारण मिळेल, यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याचे सर्वज्ञात आहे. दगडांनी भरलेला ट्रक उभा करण्याच्या दिल्ली पोलिसांच्या कथित कटाचा पर्दाफाश न्यूजलाँड्रीसारख्या माध्यमांनी आपल्या वृत्तांकनातून केला.
हेही वाचाः … आणि झुरळांनी मोदींची खुर्ची हलवली!
सुरक्षा दलांनी भाजप-आरएसएसच्या गुंडांसोबत मिळून विद्यार्थ्यांना निर्दयपणे मारहाण केली. मुलींचे कपडे फाडले, त्यांना अयोग्य प्रकारे स्पर्श केला. इतकेच नव्हे तर त्यांच्या गुप्तांगांत लाठ्याही घुसवण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण देशाने हे सर्व पाहिले. पण पंतप्रधानांनी ते पाहिले नाही आणि बेरोजगार तरुणांना ‘कॉकरोच’ म्हणणारे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत शर्मा यांनीही ते पाहण्यास नकार दिला. व्हिडीओ पुराव्यांसह दाखल करण्यात आलेली याचिका “माझ्याकडे वेळ नाही,” असे सांगून फेटाळण्यात आली.
पंतप्रधानांना शिव्या कोणी दिल्या? अभिजीत दिपके यांनी? सौरव दास यांनी? की कॉकरोच पार्टीच्या इतर कोणत्या पदाधिकाऱ्याने? काँग्रेस, समाजवादी पक्ष किंवा सीपीआय(एमएल)च्या कोणत्याही नेत्याने? यांपैकी कुणीही पंतप्रधानांना शिव्या दिल्या नाहीत. पंतप्रधानांना शिव्या दिल्या त्या या देशातील सामान्य तरुणांनी. (Modi shared second Instagram reel)
पंतप्रधानांची इच्छा अशी आहे की, सामान्य नागरिकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या निर्णयांची कोणतीही जबाबदारी सरकारने स्वीकारू नये. विद्यार्थ्यांवर पेलेट गन चालवण्याची जबाबदारी गृहमंत्री अमित शाह यांनी घेऊ नये. पण जर रस्त्यावर किंवा सोशल मीडियावर कुणी शिवी दिली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी शिक्षण व्यवस्थेत सुधारणा मागणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर टाकली जावी. हे आश्चर्यकारक नाही का?
मोदींचे फक्त शिव्यांवरच चिंतन
पंतप्रधानांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या ताज्या रीलचे नीट विश्लेषण होणे आवश्यक आहे. शिक्षणाच्या वाढत्या व्यापारीकरणामुळे आणि परीक्षा व्यवस्थेच्या होत असलेल्या ऱ्हासामुळे येणाऱ्या काळात या देशातील तरुण पिढी निष्प्रभ होईल. त्याऐवजी पंतप्रधानांनी या प्रश्नांवर विचार करून काही ठोस कृती आराखडा मांडला असता, तर ते अधिक योग्य ठरले असते.
दुर्दैव असे की, पंतप्रधानांनी या गंभीर प्रश्नांऐवजी गेल्या काही दिवसांत फक्त शिव्यांवरच चिंतन केले. ते म्हणतात की, मुलींकडून शिव्या ऐकणे हा त्यांच्यासाठी सांस्कृतिक धक्का आहे. भाजपच्या बौद्धिक प्रकोष्ठाचे माजी प्रमुख आणि पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी झालेल्या मुली-महिलांना बलात्कार व्हायला हवा, असे वक्तव्य केले. मात्र, ते पंतप्रधानांसाठी सांस्कृतिक धक्का ठरले नाही. असे का? (Modi shared second Instagram reel)
हेही वाचाः नरेंद्र मोदींना हरवता येऊ शकतं… !
कारण पंतप्रधानांना माहिती आहे की भाजप-आरएसएसची संस्कृतीच अशी आहे. शिवीगाळ, हिंसा आणि ठार मारण्याच्या धमक्या हे तिथे सामान्य आहे. शिवीगाळ ही निराशेची अभिव्यक्ती आहे—शाब्दिक हिंसेचा एक प्रकार. भाजप-आरएसएसची पायाभरणीच हिंसेवर झालेली आहे. १९९० च्या दशकातील दंगलींपासून गुजरातपर्यंतच्या घटना घडल्या नसत्या, तर आज मोदी सत्तेत असते का, हा प्रश्न आहे.
भाजपचे अनेक नेते गांधी-नेहरू कुटुंबाबद्दल सातत्याने अत्यंत अश्लाघ्य भाषा वापरत आले आहेत. कर्नाटकातील भाजपच्या एका विद्यमान आमदाराने राहुल गांधी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला घरात घुसून संपवून टाकण्याची धमकी दिली होती. त्यावेळी मात्र पंतप्रधानांना कोणताही सांस्कृतिक धक्का बसला नाही.
मोदींच्या सुरात गर्भित धमकी
देशातील तरुण आता त्यांच्याच पक्षाने वर्षानुवर्षे वापरलेल्या भाषेत त्यांना उत्तर देऊ लागले आहेत, याचाच पंतप्रधानांना राग येतो आहे का? रीलमधील पंतप्रधानांची देहबोली आणि शब्दांची निवड पाहिली, तर “क्षमा”, “आपली मुले” अशा शब्दांच्या आडून एक सूचक इशारा दडला आहे. (Modi shared second Instagram reel)
ते म्हणतात, “मुलांनी न्यायालयाचे उंबरठे झिजवणे चांगले नाही.” पंतप्रधान मोदींचा सूर तसाच होता, जसा डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना “मी तुमचे राजकीय करिअर उद्ध्वस्त करू इच्छित नाही” असा संदेश देताना लावला होता. जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या वेळी संपूर्ण देश एकजूट झाल्यासारखा वाटत होता. आता तशी सामूहिकता दिसत नसली, तरी तिची गरजही नसावी. याचाच फायदा घेत सरकारी यंत्रणा भीतीचे नवे वातावरण निर्माण करताहेत.
हेही वाचाः काँग्रेसचा नवा चेहरा गुरमेहर कौर कोण आहे?
अल्पवयीन मुलांची ओळख उघड करून त्यांना आयटी सेल आणि ट्रोल सेनेकडे सोपवले जात आहे. पोलिस घरोघरी जाऊन दबाव टाकत आहेत, जेणेकरून पालक घाबरावेत आणि भविष्यात आपल्या मुलांना रस्त्यावर उतरू देऊ नयेत. आंदोलनात सहभागी झालेल्या विविध गटांची ओळख पटवून त्यांचा छळ केला जात आहे. आंदोलनकर्त्यांना अन्न देणाऱ्या मेरठमधील एका मुस्लिम तरुणाच्या दूरच्या नातेवाईकांनाही उचलून नेले गेले. यावरून सरकारचा हेतू लक्षात येतो.
कॉकरोच आंदोलन स्थगित किंवा संपल्यानंतर पंतप्रधानांची भूमिका दोन गोष्टी स्पष्ट करते. एक म्हणजे, देशाचे पंतप्रधान मोठ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून फक्त शिव्यांवरच चिंतन करतात. आणि दुसरे म्हणजेत्यांच्या पक्षाने वर्षानुवर्षे वापरलेले हत्यार आता त्यांच्याविरुद्ध वापरले जाऊ लागले आहे,याचा त्यांना संताप येत आहे. (Modi shared second Instagram reel)
येत्या काळात दडपशाहीच्या विखुरलेल्या कारवाया सुरू राहतील, जेणेकरून देशभर भीतीचे वातावरण निर्माण होईल. मात्र, जंतर-मंतरवर जे घडले, त्याच क्षणी देशातील तरुणांच्या मनातील भीती संपली. सध्या सरकार स्वतःच्या देशातील तरुणांशी एका प्रकारचे ‘छुपे युद्ध’ लढत आहे. आणि, ही लढाई इतक्यात संपणारी नाही.