नवी दिल्ली : इराणजवळील होर्मुझजवळील सामुद्रधुनीत भारताकडे येणारे जहाज इराणने जप्त केले आहे. इराणने दोन जहाजे जप्त केली असून त्यापैकी एक जहाज भारतात गुजरात जाणार होते. होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने ही कारवाई केली आहे. तर होर्मुझबाहेर पडणाऱ्या जहाजांची अमेरिकन नौदलाने नाकेबंदी केली आहे. अमेरिका आणि इराण युद्धाची कोंडी फोडण्यासाठी युरोपियन देशांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. (Ship bound for India seized by Iran near Hormuz)
होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव असताना भारताकडे जाणाऱ्या जहाजावर इराणी सैन्याने गोळीबार केला. त्यामुळे जहाजाला अचानक माघारी परतावे लागले. हे जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात येणार होते. एपीने दिलेल्या वृत्तानुसार ही जहाजे फ्रान्सिस्का आणि एपामिनोंडास या नावाने ओळखली जातात. सागरी वाहतूक डेटानुसार लायबरेरियन ध्वज असलेले एपामिनोंडास हे कंटेनर जहाज गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील मुद्रा बंदराकडे जात होते. (Ship bound for India seized by Iran near Hormuz)