Srilanka : परेराच्या शतकाने श्रीलंकेचा विजय

नेल्सन : कुसल परेराच्या वेगवान शतकाच्या जोरावर श्रीलंकेने मालिकेतील तिसऱ्या व अखेरच्या टी-२० क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडवर ७ धावांनी विजय मिळवला. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यांतील विजयांसह यजमान न्यूझीलंडने ही मालिका २-० अशी जिंकली. (Sri Lanka)

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर श्रीलंकेने २० षटकांत ५ बाद २१८ धावा केल्या. कुसल परेराने ४६ चेंडूंमध्ये १३ चौकार व ४ षटकारांसह १०१ धावांची खेळी केली. त्याचे हे टी-२० क्रिकेटमधील पहिलेवहिले शतक ठरले. कर्णधार चरिथ असलंकाने २४ चेंडूंमध्ये १ चौकार व ५ षटकारांसह ४६ धावा फटकावल्या. श्रीलंकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडनेही कडवी लढत दिली. तथापि, न्यूझीलंडला २० षटकांत ७ बाद २११ धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडतर्फे रचिन रवींद्रने सलामीला येऊन ३९ चेंडूंमध्ये ५ चौकार व ४ षटकारांसह ६९ धावा केल्या.

अखेरच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी २२ धावांची आवश्यकता होती. मात्र, कर्णधार मिचेल सँटनर आणि झॅकरी फोक्स या जोडीला १४ धावाच करता आल्या. श्रीलंकेकडून असालंकाने ३, तर वनिंदू हसारंगाने २ विकेट घेतल्या. कुसल परेरा सामनावीर ठरला, तर मालिकेत ८ विकेट घेणाऱ्या न्यूझीलंडचा जेकब डफीने मालिकावीराचा पुरस्कार पटकावला. (Srilanka)

संक्षिप्त धावफलक : श्रीलंका – २० षटकांत ५ बाद २१८ (कुसल परेरा १०१, चरिथ असालंका ४६, कुसल मेंडिस २२, जेकब डफी १-३०) विजयी विरुद्ध न्यूझीलंड – २० षटकांत ७ बाद २११ (रचिन रवींद्र ६९, टीम रॉबिन्सन ३७, डॅरेल मिचेल ३५, चरिथ असालंका ३-५०, वनिंदू हसारंगा २-३८).

हेही वाचा :

Related posts

KSA Football :‘शिवाजी’ची ‘दिलबहार’वर मात

Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १२ जानेवारीला संघनिवड

‌Bumrah Injury : बुमराह इंग्लंडविरुद्धच्या मालिकेस मुकणार?