Pawar snubs Kokate: एक-दोनदा झाली, तिसऱ्यांदा चूक करू नका

Pawar snubs Kokate

Pawar snubs Kokate

मुंबई : ‘‘एकदा, दोनदा…झाली, पण तिसऱ्यांदा तीच चूक कराल तर, खपवून घेणार नाही, ’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना सुनावले. शेतकऱ्यांबद्दल सातत्याने अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी कोकाटे यांच्याविरोधात राज्यात संतापाची लाट उसळली होती. (Pawar snubs Kokate)

या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या बैठकीत पवार यांनी हा इशारा दिला. कोकाटे यांनी तिसऱ्यांदा पक्षाला लाजिरवाणे वक्तव्य केले तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे ते म्हणाले. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने हे वृत्त दिले आहे. (Pawar snubs Kokate)

बैठकीवेळी कुणा मंत्र्यांचे नाव न घेता, पवार यांनी पक्षाच्या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करणारी विधाने करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्यांनी कोकाटे यांनी केलेल्या दोन विधानांचा उल्लेख केला. त्यांच्याकडे कृषी खाते असूनही शेतकऱ्यांचा अवमान केला होता. फेब्रुवारीमध्ये कोकाटे यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी केली आणि म्हटले होते की, “आजकाल भिकारीही एक रुपयाही स्वीकारत नाहीत आणि तरीही सरकार शेतकऱ्यांना फक्त एक रुपयाला पीक विमा देते.”

त्यानंतर, गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी करायला गेल्यावर कोकाटे यांनी शेतकऱ्यांवर पीक कर्जमाफीचा फायदा मिळावा म्हणून जाणूनबुजून पीक कर्ज बुडवत असल्याचा आणि नंतर लग्न आणि लग्नसराईसारख्या कार्यक्रमांवर बचत केलेल्या पैशांची उधळपट्टी करता, असा आरोप केला होता. ‘‘तुम्ही लोक पीक कर्ज घेता आणि नंतर ५ ते १० वर्षे ते कर्ज बुडवता, जेणेकरून कर्ज माफ होईल. शेतकरी त्यांच्या शेतीत पैसे गुंतवत नाहीत. राज्य सरकार तुम्हाला ठिबक सिंचनापासून तलाव, पाइपलाइन इत्यादी सर्व गोष्टींसाठी आर्थिक मदत देते. शेतकऱ्यांसाठी नाही तर वेगवेगळ्या गोष्टींसाठी पैसे देऊन भांडवली गुंतवणूक सरकार करते,” असे गेल्या शनिवारी मंत्री कोकाटे म्हणाले. तसा व्हिडीओही व्हायरल झाला होता. (Pawar snubs Kokate)

फसवणुकीने फ्लॅट मिळवल्याचा कोकाटेंवर ठपका

नाशिकमधील सिन्नर विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार राहिलेले कोकाटे हे महायुतीच्या नवीन आघाडी सरकारमध्ये कृषी मंत्री झाले. फेब्रुवारीमध्ये स्थानिक न्यायालयाने त्यांना त्यांच्या भावासह तीन दशकांपूर्वीच्या एका प्रकरणात फसवणूक आणि बनावटगिरीच्या आरोपाखाली दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गटातून दोन फ्लॅट्स मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून फसवणूक करून मिळवल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले.

जनता दरबार सुरू करा
जनता दरबाराच्या बैठकांना गैरहजर राहिल्याबद्दल पवार यांनी त्यांच्या मंत्र्यांनाही फटकारले. काही प्रकरणांमध्ये, मंत्री त्यांच्या खाजगी सचिवांना या सार्वजनिक मेळाव्यांसाठी पाठवत आहेत. लोक तक्रारी मांडतात त्या सोडवल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.

हेही वाचा :
सत्य का नाकारताय?
‘काश्मीर फाईल्स’ चालतो, मग ‘फुले’वर आक्षेप का?

Related posts

India’s major decisions

India’s major decisions: सिंधू करार स्थगित, अटारी चेक पोस्ट बंद

Shivaji enter semi final

Shivaji enter semi final : शिवाजी तरुण मंडळ उपांत्य फेरीत

Luxury Goods

Luxury Goods : महागड्या वस्तू घेताय?… १% टीसीएस लागू