पाकिस्तानच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : इंग्लंडने मुलतानच्या पहिल्या कसोटीत एक डाव आणि ४७ धावांनी पाकिस्तानचा पराभव केला. मुलतान कसोटीच्या पहिल्या डावात ५५६ धावा करूनही पाकिस्तानला इंग्लंडकडून हार पत्करावी लागली. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात पाकिस्तानने ५५६ धावा केल्या. प्रत्युत्तर देताना इंग्लंडने डाव ७ फलंदाज गमावून ८२३ धावांवर डाव घोषित केला. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेला पाकिस्तानी संघ अवघ्या २२० धावा करू शकला. या पराभवासह पाकिस्तान संघाने लज्जास्पद विक्रम आपल्या नावावर केला. (PAK vs ENG)

कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात ५०० हून अधिक धावा केल्यानंतर एका डावाने पराभूत होणारा पाकिस्तान पहिला संघ ठरला आहे. यापूर्वी २०२३ साली आयर्लंडने पहिल्या डावात ४९२ धावा करून गॉल कसोटीत श्रीलंकेकडून एक डाव आणि १० धावांनी पराभव पत्करावा लागला होता. पाकिस्तानचा हा सलग सहावा कसोटी पराभव आहे.

पाकिस्तानची सुमार कामगिरी

पाकिस्तानी संघाला आपल्या माय भूमीत ११ कसोटीत विजय मिळवता आलेला नाही. मार्च २०२२ पासून झालेल्या ११ कसोटी सामन्यातील सात कसोटीत पराभव स्वीकारावा लागला आहे. तर उर्वरित कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. (PAK vs ENG)

याआधी फेब्रुवारी १९६९ ते मार्च १९७५ या कालावधीत पाकिस्तानला ११ कसोटीत विजयी होता आले नव्हते. यामध्ये पाकिस्तानी संघ ११ पैकी एका सामन्यात पराभूत झाला होता, तर, उर्वरित १० सामने अनिर्णित राहिले होते.

इंग्लंडने आशियामध्ये डावाच्या फरकाने कसोटी जिंकण्याती ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी दिल्लीत झालेल्या सामन्यात भारताटा एक डाव आणि २५ धावांनी पराभव केला होता. मायभूमीत पाकिस्तानचा हा पाचवा सर्वात मोठा पराभव आहे. या यादीत वेस्ट इंडिज अव्वल स्थानावर आहे. त्यांनी १९५९ मध्ये घरच्या मैदानावर पाकिस्तानचा एक डाव आणि १५६ धावांनी पराभव केला होता.

पाकिस्तानने गमावले सर्वाधिक सामने

पहिल्या डावात ५०० हून अधिक धावा केल्यानंतर पाकिस्तानने पाच कसोटी सामने गमावले आहेत. या यादीत ऑस्ट्रेलिया तीन पराभवांसह दुसऱ्या तर, इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेश प्रत्येकी दोन पराभवांसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत.

हेही वाचा :

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत