Oppositions support: कारवाईसाठी सरकारला विरोधकांचा संपूर्ण पाठिंबा

Oppositions support

नवी दिल्ली : ‘पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार करत असलेल्या कोणत्याही कारवाईला विरोधकांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे,’ असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितले. (Oppositions support)

पहेलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला राहुल गांधी उपस्थित होते. या बैठकीनंतर ते बोलत होते.

केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. सर्व पक्षांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. आम्ही म्हटले आहे की जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. (Oppositions support)

राहुल गांधी म्हणाले की, विरोधकांनी सरकारला कोणतीही कारवाई करण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला आहे. हल्ल्यातील जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस करण्यासाठी मी जम्मू काश्मीरला भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अटारी चौकी बंद

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अटारी एकात्मिक तपासणी चौकी (आयसीपी) बंद करण्याचा भारत सरकारने निर्णय घेतल्यानंतर, पंजाब पोलिसांचे प्रोटोकॉल अधिकारी अरुण महल यांनी, प्रतीकात्मक सीमा दरवाजे बंद राहिले असले तरी, दोन्ही देशांनी त्यांचे संबंधित समारंभ स्वतंत्रपणे पार पाडले. २८ पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परत पाठवण्यात आले, तर १०५ भारतीय नागरिक मायदेशी परतले असल्याचे सांगितले. (Oppositions support)

‘‘भारत सरकारने खूप कठोर निर्णय घेतले आहेत. अटारी-वाघा एकात्मिक तपासणी चौकीचे दरवाजे उघडण्यात आले नाहीत. अटारी सीमेवरून एकूण २८ पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानला रवाना झाले आणि १०५ भारतीय नागरिक पाकिस्तानातून परतले आहेत. पर्यटकांच्या संख्येवर परिणाम झाला आहे,’’ असे अधिकाऱ्यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले.

भारतीय हवाई दलाच्या विमानांचा सराव

भारतीय हवाई दल मध्यवर्ती क्षेत्रातील एका मोठ्या भागात आक्रमण (हल्ला) हा सराव करत आहे. यामध्ये राफेल लढाऊ विमानांचा समावेश आहे.

भारतीय हवाई दल पश्चिम बंगालमधील अंबाला आणि हाशिमारा येथे राफेल विमानांचे दोन स्क्वॉड्रन चालवते.

‘‘अत्याधुनिक तंत्रज्ञानांनी सज्ज असलेली लढाऊ विमाने जमिनीवर हल्ला आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध सरावांसह जटिल मोहिमा पार पाडत आहेत,’’ असे संरक्षण सूत्रांनी एएनआयला सांगितले. (Oppositions support)

हेही वाचा :
 पीएसएलचे प्रक्षेपण भारतात बंद

Related posts

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?

नरेंद्र मोदींना हरवता येऊ शकतं… !