एसटीच्या हंगामी भाडेवाढीस एक महिन्याची मुदतवाढ

One-month extension for the ST fare hike

जमीर काझी : मुंबई  : वाढत्या इंधन खर्चामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळावर (एसटी) पडणारा आर्थिक भार लक्षात घेऊन  साध्या बससेवांसाठी लागू करण्यात आलेल्या १० टक्के हंगामी भाडेवाढीला आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे वाढीव भाडेदर आता १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत  कायम राहणार आहेत. (One-month extension for the ST fare hike)

वाढत्या महागाईमुळे आधीच त्रस्त झालेल्या नागरिकांना आता एसटीची भाडेवाढ कायम राहणार असल्याने  आता प्रवास करण्यासाठी त्यांच्या खिशाला आणखी कात्री  लागणार आहे.  उन्हाळी गर्दीच्या हंगामात प्रवासी वाहतुकीचे प्रभावी नियोजन आणि महसूलवाढीच्या उद्देशाने महामंडळाने गेल्या १५ एप्रिल पासून साध्या बससेवांच्या भाड्यात १० टक्के हंगामी वाढ लागू केली होती. या भाडेवाढीची मुदत १५ जूनपर्यंत होती. मात्र, इंधन दरवाढीमुळे वाढलेल्या खर्चाचा विचार करता तसेच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झालेली वाढ लक्षात घेऊन या निर्णयास मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे. (One-month extension for the ST fare hike)

या निर्णयानुसार साधी व मिडी बससेवांसाठी प्रति टप्पा दर ११.०५ रुपये कायम राहणार असून, किमान प्रवासभाडे प्रौढ प्रवाशांसाठी १४ रुपये आणि मुलांसाठी ७ रुपये असेच राहील. महामंडळाने सर्व विभाग नियंत्रक, प्रादेशिक व्यवस्थापक आणि संबंधित अधिकाऱ्यांना या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. (One-month extension for the ST fare hike)

Related posts

कॉकरोच पार्टीचे अभिजीत दिपके यांच्यावर हल्ला 

मोहन भागवतांना पाकिस्तानी म्हणणार का? : संजय राऊत

वाढीव वीजबिले, स्मार्ट मीटर प्रकल्प स्थगित करा : जयंत पाटील