भारतीय वंशाच्या नावी पिल्ले शांततेचे नोबेल जाहीर

Nobel Peace Prize awarded to Navi Pillay

नवी दिल्ली : प्रतिनिधी : दक्षिण अफ्रिकेतील भारतीय वंशाच्या कायदेतज्ज्ञ, मानवधिकार कार्यकर्त्या नवनेथम उर्फ नावी पिल्लेंना २०२६ चं शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. नार्वेच्या नोबेलविषयक समितीने सर्व निकषांचा विचार करुन नावी पिल्लेंच्या नावाची घोषणा केली. यंदा जगातील आठ युद्धे मी थांबवली असा दावा करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नोबेल पारितोषिक आपल्याला मिळावे असा दावा केला. पण त्यांच्या दाव्याकडे नोबेल समितीने दुर्लक्ष करत पिल्लेंच्या नावावर शिक्कामोर्तब केले. गवतर्षी व्हेनेझुएलच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. नार्वेची राजधानी ओस्लो येथे १० डिसेंबर रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. (Nobel Peace Prize awarded to Navi Pillay)

कोण आहेत नावी पिल्ले

नावी पिल्ले यांचा जन्म २३ सप्टेंबर १०४१ मध्ये अफ्रिकेतील डर्बन येथे झाल्या. त्यांचे पालक तामिळ वंशाचे होते.त्यांचे शिक्षण हार्वर्ड विद्यापीठात झाले.  १९६७ मध्ये नेतल प्रांतात त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली. या प्रांतात वकिल म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या माहिला होत्या. त्यांनी वर्णभेदाचे खटले लढले. तसेच राजकीय कैद्यांना दिल्या जाणाऱ्या अपमनास्पद वागणुकीसाठी त्यांनी लढा दिला.  १९९५ मध्ये नावे पिल्ले दक्षिण अफ्रिकेच्या उच्च न्यायालयात पहिल्या कुष्णवर्णीय न्यायाधीश म्हणून रुजू झाल्या होत्या.  वर्णद्वेषाविरोधात लढणाऱ्या नेल्सन मंडेला आणि इतर कार्यकर्त्यांच्या बचावासाठी त्यांनी सुरवातीच्या काळात कायदेशीर लढा दिला होता. नावी पिल्ले यांनी सप्टेंबर २००८ ते ऑगस्ट २०१४ या कालावधीत संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून काम पाहिले आहे. (Nobel Peace Prize awarded to Navi Pillay)

Related posts

गोकुळ निवडणूक चिन्ह वाटपात मुख्यमंत्री फडणवीसांचा हस्तक्षेप

मेट्रो बंदवरुन सर्वोच्च न्यायालयाचे कडक ताशेरे

सर्वोच्च न्यायालयाकडून माधुरी हत्तीण प्रकरणी पेटाला २५ हजाराचा दंड