नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी अंबाबाईची श्री गायत्री देवी रूपात पूजा

कोल्हापूर; प्रतिनिधी : अश्विन शुद्ध चतुर्थी म्हणजेच शारदीय आजच्या दिवशी श्री अंबाबाईची श्री गायत्री देवी रूपातील अलंकार नवरात्रातील पूजा साकारण्यात आलेली आहे. पौराणिक संदर्भानुसार श्री गायत्री देवीला वेदमाता असे संबोधले जाते. गायत्री देवीच्या उत्पत्तीच्या कथेची सुरुवात विश्वाच्या निर्मितीपासून होते. जेंव्हा ब्रम्हदेवांना विश्वाची निर्मिती करायची होती, तेव्हा त्याचे सुलभीकरण करण्यासाठी त्यांनी दिव्य अशी दैवी स्त्रीशक्ती प्रकट केली. जिचे मूर्त स्वरूप म्हणजेच गायत्री देवी होय, गायत्री देवीची पाच मुखे ही पंचतत्वे पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश यांचे प्रतिनिधित्व करतात. ती कमलासनावर विराजमान आहे. तिचे कमळ हे आसन पावित्र्य आणि आध्यात्मिक जागृतीचे प्रतिक आहे. गायत्री देवीला १० हात आहेत. (Navratri Ustav 2024)

सूर्य हा वैश्विक प्रकाशाचा, तेजाचा व जीवनाचा प्रतीक मानला जातो आणि गायत्री देवी ही त्याच्या तेजाची प्रतिनिधी आहे. गायत्री मंत्राच्या माध्यमातून सूर्याची उपासना केली जाते. न गायत्र्याः परो मंत्र : ।’ अर्थात, गायत्री मंत्रापेक्षा श्रेष्ठ असा दुसरा मंत्र नाही, जो ऋग्वेदाच्या तिसऱ्या मंडळातील ६२ व्या सूक्तातील १० वा मंत्र. आहे. ॐ भूर्भुवः स्वः । तत्सवितुर्वरेण्यम् । भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् । अर्थ :- भूलोक (पृथ्वी), भुवर्लोक आणि स्वर्गलोक व्यापणाऱ्या प्रकाशमान पूजनीय सवित्र (सूर्य) देवाचे आम्ही ध्यान करतो, जो आमच्या बुद्धीला (सर्वांगीण उन्नती साठी) प्रेरणा देवो. गायत्री मंत्र विश्वामित्र ऋषींनी सिद्ध केला आणि गायत्री मंत्राच्या तपश्चर्येनेच त्यांना प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले. देवी भागवत पुराणामध्ये गायत्री उपसानेचे वर्णन दिले आहे. गायत्री मंत्राला मंत्रराज, अमृतमंत्र व महामंत्र अशी अन्य नावे आहेत. धार्मिक पूजेच्या अगोदर गायत्री मंत्रासहित प्राणायाम केला जातो.

श्री गायत्री देवी ही ज्ञान आणि आध्यात्मिक उन्नतीची अधिष्ठात्री देवता असून तिची उपासना ही आध्यात्मिक आणि भौतिक प्रगतीसाठी केली जाते. श्री गायत्री देवी सर्वांची सर्वांगीण उन्नती करो, हीच तिच्या चरणी प्रार्थना ! ही पूजा श्रीपूजक मयुर मुकुंद मुनिश्वर, अरुण मुनिश्वर,सोहम मुनिश्वर, सुकृत मुनिश्वर यांनी बांधली. (Navratri Ustav 2024)

गोल्डन रंगाचे व मरुन बाळ रंगाचे काठ असणारे महावस्त्र किंमत १,२८ ७००/- तिरुपती देवस्थान कडून अर्पण सदर महावस्त्र अर्पण करणे करीता बी. शशिधर यांनी सपत्नीक येऊन सदरचे महावस्त्र मा. प्रशासक तथा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे कडे सुपूर्द केले. यावेळी देवस्थान समितीचे सचिव श्री. शिवराज नाईकवडे, व्यवस्थापक श्री महादेव दिंडे व अन्य देवस्थान समिती कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा :

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी