मुंबईः एकाच नंबरच्या दोन गाड्या असू शकत नाहीत. एखाद्यानं बनावट नंबर प्लेट तयार करून घेतली तरच अशा प्रकारे एकाच नंबरच्या दोन गाड्या असू शकतात. पण अशा गाड्या समोरासमोर आल्या तर…? मुंबईत ताज हॉटेलजवळ अशा प्रकारचे नाट्य समोर आले आणि त्यातून अनेक दिवसांचं एक कोडं उलगडलं. (Two cars same number)
एकाच नंबरच्या दोन गाड्या समोरासमोर आल्यानंतर त्यातील एका ड्रायव्हरनं त्यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही गाड्या जप्त करून कुलाबा पोलिस ठाण्यात नेल्या.
एकाच नंबरच्या या दोन्ही गाड्या ताज हॉटेलच्या गेटच्या आत होत्या. दोन्ही गाड्या मारुती सुझुकीच्या असून त्यापैकी एक मारुती अर्टिगा कार आहे. तिचा नंबर MH01EE2388 असा आहे. या गाडीच्यामागे आणखी एक मारुती कार दिसली. (Two cars same number)
वारंवार दंडाचे मेसेज
यासंदर्भाती जी प्राथमिक माहिती समोर आली आहे, त्यानुसार एका ड्रायव्हरनं आपल्या गाडीचा नंबर बदलून बनावट नंबर प्लेट लावली. योगायोगानं मूळ गाडी आणि बनावट नंबर प्लेटची गाडी एकाचवेळी ताज हॉटेलला पोहोचल्या. मूळ नंबरच्या गाडीमालकानं त्यासंदर्भात पोलिसांना माहिती कळवली. शाकिर अली असे या मूळ गाडीच्या मालकाचे नाव आहे.
शाकिर अलीला अलीकडं सतत दंड झाल्याचे मेसेज येत होते. म्हणजे त्यांची गाडी ज्या रस्त्याला गेली नाही, तिथे नियम मोडल्यासंदर्भातील दंडाचे मेसेज येत होते. त्यामुळे तो चक्रावून गेला होता. तसेच काही ठिकाणी टोलनियमांचे उल्लंघन केल्याचेही मेसेज येत होते. त्यासंदर्भात त्याने पोलिसांनाही कल्पना दिली होती, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही.
आपली गाडी नसताना दंडाच्या नोटिसा येत होत्या.Two cars one number, याचा अर्थ कुणीतरी आपल्या नंबरप्लेटचा वापर करीत असल्याचे त्यांच्या लक्षात येत होते. संबंधित गाडीचा शोध घेण्याचे प्रयत्न त्याच्याकडून व्यक्तिगत पातळीवरही सुरू होते. आज त्यांना स्वतःला मित्रांसोबत असताना गेट वे ऑफ इंडियाजवळ ताज हॉटेलच्या आवारात बनावट नंबरची गाडी आढळली. (Two cars same number)
वस्तुस्थिती काय
शाकिर अलीच्या गाडीचा नंबर MH01EE2388 आहे, आणि दुस-या गाडीचा नंबर MH01EE2383 होता. ही गाडी प्रसाद कदम नामक गृहस्थांच्या मालकीची आहे. आपण मुद्दामहोऊन आपल्या गाडीच्या नंबरचा शेवटचा अंक तीनचा आठ (‘3’ चा ‘8’) केल्याचे प्रसाद कदमने सांगितले. फायनान्स कंपनीच्या वसुली एजंटपासून बचावासाठी त्याने ही क्लृप्ती केली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याच्या गाडीचे हप्ते तटले होते, त्यामुळे त्याने हा प्रकार केला होता. (Two cars same number)