बहुगुणी मोरींगा पावडर

मोरींगा पावडर म्हणजे शेवग्याच्या पानांची पावडर होय. दक्षिण भारतात शेवग्याच्या वृक्षांचा आढळ मोठ्या प्रमाणात आहे.  शेवग्याच्या शेंगाचा सर्वाधिक उपयोग आहारात होतो. काही भागात शेवगा हा दररोजच्या आहारातील अविभाज्य घटक बणला आहे. शेवग्याच्या शेंगामध्ये व पानामध्ये  भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि पोषक घटक असल्याने त्या झाडाची पाने, फुले, मुळ आणि झाडावर येणाऱ्या शेंगा या सर्वांचा खाद्यान्न म्हणून समावेश केला जातो. शेवग्याच्या पानांच्या पावडरचे शरीराला अनेक फायदे आहेत.

कशी बणवतात पानांची पावडर

शेवग्याच्या पानांची पावडर तयार करण्यासाठी सर्वप्रथम झाडाच्या  फांद्या आणूण  पाने काढून घ्यावीत. ही पाने स्वच्छ करून सुकवून घ्यावीत. ही पाने उन्हात पुर्णपणे  सुकवल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावीत, त्यानंतर चाळणीने चाळूण घ्यावीत. यानंतर तयार झालेल्या  शेवग्याच्या पानांच्या पावडरचे पाण्यातून सेवन करावे.

पावडर उर्जेचा स्तोत्र 

शेवग्याच्या पानांच्या पावडरमध्ये मॅग्नेशियम आणि आयरर्नची मात्रा जास्त असल्याने थकवा आणि अशक्तपणा कमी होतो. मोरिंगा ही एक अत्यंत उपयुक्त आणि औषधीय वनस्पती आहे. त्याचे पान, फुले, बीजे, आणि त्याचे तेल सर्व उपयोगी आणि वापरण्यात योग्य आहे. शेवग्याचे पान पोषक तत्त्वांचा अचूक स्रोत मानले जाते.
मोरिंगाचे औषधीय गुणधर्म अनेक आहेत, ज्यामध्ये लोह, कॅरोटीनोइड्स, व्हिटॅमिन सी, पॉलीफेनॉल, आणि क्वेर्सेटिन यांची उच्च सामग्री आहे. त्यामुळे मोरिंगाचे नियमित सेवन करण्यात विविध आरोग्यदायी लाभ मिळू शकतात. मोरिंगा पावडर हे व्हीटॅमिन ए, व्हीटॅमिन सी, व्हीटॅमिन ई, फॉलेट, कॅल्शियम, आयरन, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांचे समृद्ध भाण्डार आहे.

हे सर्व विटामिन आणि मिनरल्स आपल्या शरीरासाठी अत्यंत पोषक आहेत.  त्यामुळे मोरिंगाचे आहारात एक महत्वाचं स्थान आहे.

अँटिऑक्सिडेंट आहे

मोरिंगा पावडरमध्ये अनेक शक्तिशाली अन्टीऑक्सिडंट असतात, यामुळे आपले शरीर स्वच्छ आणि सुरक्षित राहण्यास मदत होते. मोरिंगा पानांमधील अँटिऑक्सीडेटिव्ह गुणधर्म हे वातावरणातील मुक्त रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावापासून संरक्षण करतात. मोरींगा पावडर जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी स्थिर करण्यात भूमिका बजावते.

वजन कमी करण्यास फायदेशीर

शेवग्याचे नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या मेटाबॉलिज्मला मदत करून वजन कमी होण्यात मदत होते. याबरोबरच तुमचा आहार संतुलित असावा लागतो

Related posts

पोटातले ओठावर!

हिंदुदुर्ग!

Lok Sabha : खेळपट्टी खराब करण्याचा संसदीय खेळ