मुकुल चौधरीच्या तडाखेबाज खेळीने ‘लखनऊ’ने विजय खेचला.

Mukul Chaudhary's explosive innings

नवी दिल्ली : आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत मुकुल चौधरीने दोन चौकार, सात षटकार खेचत ५४ धावांची निर्णायक तडाखेबाज खेळी करत लखनऊ सुपर जायंटसने कोलकोता नाईट रायडर्सवर तीन गडी राखून विजय मिळवला.

सामन्याच्या निर्णायक क्षणी मुकुल आणि आवेशने आठव्या गड्यासाठी नाबाद ५४ धावांची यशस्वी भागीदारी केली. ही भागिदारी केवळ २४ चेंडूत केली. दोघांच्या खेळीने सामन्याचे चित्रच पालटून गेले. अखेरच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत दोघांच्या खेळीने उत्कंठा ताणून धरली गेली. (Mukul Chaudhary’s explosive innings)

कोलकोता संघाने १८१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना लखनऊची अवस्था ७ बाद १२८ अशी बिकट झाली होती. त्यानंतर अवघा तिसरा सामना खेळणाऱ्या मुकुलने कोलकोत्याच्या गोलंदाजीवर तुटून पडला. मुकुलने सात षटकार ठोकले. सातव्या किंवा त्याखालील क्रमांकावर येऊन खेळताना त्याने सात षटकार खेचले. यापूर्वी २०१८ मध्ये चेन्नई सुपर किग्लच्या ब्राव्होने सात षटकार खेचले होते. मुकेशला आवेशने आत्मविश्वासी साथ दिली. १९ व्या षटकात मुकेलने दोन षटकार आणि एक चौकार ठोकून सामन्याचा नूरच बदलून टाकला. शेवटच्या षटकात लखनऊला चौदा धावांची गरज होती. वैभव अरोराच्या गोलंदाजीवर त्याने दोन षटकार खेचले. शेवटच्या चेंडूवर एक धावेची गरज होती. पण मुकुल आणि आवेशने विजयी धाव चोरली. (Mukul Chaudhary’s explosive innings)

 केकेआरने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १८१ धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणेने ४१ धावा केल्या. अंगक्रिश रघुवंशीने ४५, कॅमरुन ग्रीनने ३२ तर पॉवेलने ३९ धावा केल्या. लखनऊची सुरुवात अडखळत झाली. मिचेल मार्शने १६, मारकमने २२, कर्णधार ऋषभ पंतने १० धावा केल्या. आयुष बदानीने अर्धशतक झळकावले. त्यानंतर मुकुल चौधरीने धडाकेबाज वेगवान खेळी करत सामना खेचून आणला. मुकुलने दोन चौकार आणि सात षटकार खेचत २७ चेंडूत ५४ धावा केल्या. (Mukul Chaudhary’s explosive innings)

Related posts

आयपीएलमध्ये विदर्भाच्या प्रफुल्ल हिंगेचा नवा विक्रम  

सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत ‘दिलबहार’उपांत्य फेरीत  

श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा सनराईज हैद्राबादवर विजय