खासदार राजेश यादव यांना पुन्‍हा जीवे मारण्‍याची धमकी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पुर्णियाचे खासदार राजेश उर्फ पप्पू यादव यांना पुन्हा एकदा जीव मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानमधून आलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये “आमचे सहकारी तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. तुम्हाला तुमचे सुरक्षा रक्षकही वाचवू शकणार नाहीत. शेवटच्‍या दिवसांचा आनंद घ्‍या” अशा शब्‍दांत पप्पू यादव यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासह लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव घेत ऑडिया कॉलही करण्‍यात आला आहे.

खासदार पप्पू यादव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यासाठी व्हॉट्सॲपवर मेसेज केला आहे. यासह त्यांना सात सेकंदाचा फोन करण्यात आला होता. पाकिस्तानमधून आलेल्या धमकीच्या कॉलमध्ये पाच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. या मेसेजमध्ये आपण लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचे धमकी देणाऱ्याने म्हटले आहे.

निवासस्थानाची सुरक्षा वाढवली

खासदार राजेश उर्फ पप्पू यादव यांच्या पुर्णिया येथील निवासस्थानकाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांना मिळणाऱ्या धमक्या लक्षात घेत त्यांच्या मित्राने खासदार यादव यांना २.५ कोटी रूपये किमतीची बुलेटप्रुफ गाडी भेट दिली आहे. मात्र, त्यालाही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले