उद्धव ठाकरेंनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली : राज ठाकरे  

मुंबई; विशेष प्रतिनिधी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर ज्या काँग्रेसला विरोध केला त्यांच्याच दावणीला उद्धव ठाकरेंनी शिवसेना बांधली. स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी हे काम केले, अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी केली.

वरळीतील मनसे उमेदवार संदीप देशपांडे यांच्या प्रचार सभेत त्यांनी ठाकरे व शरद पवार यांच्यावर कडाडून हल्ला चढविला. त्यांचे पुतणे व वरळीतील विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली. ते म्हणाले, सर्वजण म्हणतात, मी भूमिका बदलतो. मात्र भूमिका बदलणे म्हणजे काय हे उद्धव ठाकरे, शरद पवार यांची राजकीय कारकीर्द पाहिल्यानंतर लक्षात येते. २०१९ ची निवडणूक भाजपा व शिवसेना आणि काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी एकत्रित लढवली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह  प्रचार सभांमध्ये पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असे सांगत होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेतला नाही. मात्र निवडणूक निकालानंतर त्यांच्या लक्षात आले की आपल्याशिवाय सरकार बनत नाही. त्यावेळी त्यांनी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा उपस्थित केला आणि स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यासमवेत गेले. त्यांना जर  पदाच्या वाटणीबाबत ठरले होते तर ते आधी का बोलले नाहीत?, शरद पवार यांनी यांचे निम्मे राजकीय आयुष्य भूमिका बदलण्यातच गेले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ