क्लासमधून घरी परताना अल्पवयीन मुलीचा विनयभंग; देशभरात संतापाची लाट

Minor girl molested while returning home from class in Bihar

पटना :  कोचिंग क्लासमधून परतणाऱ्या विद्यार्थ्यीनीला अडवून टोळक्यांनी विनयभंग केला. टोळक्यांनी मुलीवर जबरदस्तीने लगट केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. या व्हिडिओची दखल घेऊन पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. ही घटना बिहारमधील जमुई जिल्ह्यात घडली आहे. (Minor girl molested while returning home from class in Bihar)

हात जोडून माफी मागूनही मुलीचा विनयभंग

कोचिंग क्लासमधून दुचाकीने अल्पवयीन मुलगा आणि मुलगी परत असताना एका टोळक्याने त्यांना मारहाण केली. तसेच मुलीचा विनयभंग केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. शनिवारी १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता ही घटना घडली. मुलगा आणि मुलगी दहावी इयत्तेत शिक्षण घेतात. व्हिडिओमध्ये टोळक्यातील तरुण मुलाची कॉलर पकडून त्याला मारहाण करताना दिसत आहेत. तसेच ती मुलगी हात जोडून माफी मागून सुटका करण्याची काकुळतीने विनंती करत होती. टोळक्यातील एका नराधमाने मुलीला जबरदस्तीने बाईकवरुन उतरवले. ती मुलगी हात जोडून आम्हाला जाऊ द्या, आम्ही पुन्हा कधीच येणार नाही अशी गयावया करत होती. एका नराधमाने मुलीच्या छातीला स्पर्श केल्याचे दिसत आहे. (Minor girl molested while returning home from class in Bihar)

राहूल गांधीकडून संताप व्यक्त

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर देशभर संतापाची लाट पसली. जमुई पोलिसांनी तात्काळ दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. आत्तापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेवर राहूल गांधींनी संताप व्यक्त करत महिलांशा सुरक्षिततेवरुन सरकारवर टीका केली आहे.

तीन संशयितांना अटक

प्रसारमाध्यमांशी बोलताना जमुईचे पोलिस अधीक्षक विश्वजीत दयाल म्हणाले, या गुन्ह्यात सहभागी आरोपींना अटक करण्यासाठी डीवायएसपी दीप्ती मोनाली यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली आहे. याबाबत आमच्याकडे मुली अथवा मुलगीने तक्रार केलेली नाही. पण जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा क्लिपमध्ये दिसणाऱ्या दुचाकीच्या नोंदीवर आम्ही पिडितांचा शोध घेतला आहे. व्हिडिओतून सात जणांची ओळख पटवली आहे. त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. (Minor girl molested while returning home from class in Bihar)

Related posts

ज्ञानेश कुमारांनी राजीनामा न दिल्यास पुन्हा जंतरमंतरवर जाणार :  अभिजीत दिपकें

उपमुख्यमंत्रीचे पुत्र म्हणून पार्थ पवाराना वेगळा न्याय मिळतोय का?

प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या २०० खेळाडूंचा होणार गौरव