Marnus Stoinis : स्टॉइनिसची वन-डेतून तडकाफडकी निवृत्ती

Marnus Stoinis

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्नस स्टॉइनिसने गुरुवारी आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी निवडलेल्या प्राथमिक ऑस्ट्रेलिया संघामध्ये त्याचे नाव होते. परंतु, त्याने या स्पर्धेतही न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. (Marnus Stoinis)

यापुढे टी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रित करू इच्छित असल्याने वन-डे क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे ३५ वर्षीय स्टॉइनिसने म्हटले आहे. “ऑस्ट्रेलियाकडून वन-डे क्रिकेट खेळण्याचा प्रवास खूप सुंदर होता. या प्रवासातील प्रत्येक क्षणाबद्दल मी कृतज्ञ आहे. निवृत्तीचा निर्णय घेणे सोपे नव्हते. परंतु, वन-डेतून निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मला वाटले,” असे स्टॉइनिसने सांगितले. २०१५ साली वन-डे पदार्पण करणाऱ्या स्टॉइनिसने ७१ सामन्यांमध्ये १,४९५ धावा केल्या असून १ शतक व ६ अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय, त्याच्या नावावर वन-डेमध्ये ४८ विकेटही जमा आहेत. २०२३ मध्ये वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचा तो सदस्य होता. (Marnus Stoinis)

नोव्हेंबर, २०२४ मध्ये स्टॉइनिस अखेरचा वन-डे सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला. या सामन्यात त्याला केवळ ८ धावा करता आल्या होत्या. (Marnus Stoinis)

हेही वाचा :

श्रीलंकेच्या पहिल्या दिवशी ९ बाद २२९ धावा
कमिन्स, हेझलवूड चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार
श्रीनाथ, मेनन यांचा पाकला जाण्यास नकार

Related posts

आयपीएलमध्ये विदर्भाच्या प्रफुल्ल हिंगेचा नवा विक्रम  

सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत ‘दिलबहार’उपांत्य फेरीत  

श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा सनराईज हैद्राबादवर विजय