Malegaon Blast case: मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आता या दिवशी…

Malegaon Blast case

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ३१ जुलै रोजी लागण्याची शक्यता आहे. या दिवशी सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या खटल्यात भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यासह अन्य आरोपी आहेत. (Malegaon Blast case)

शिक्षा सुनावण्यासंदर्भात योग्य वेळ मिळावा, यासाठी एनआयए विशेष न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाकडे आणखी वेळ मागितला. त्यामुळे निकालाची तारीख लांबणीवर पडली. आज सर्व आरोपी एनआयए कोर्टात हजर झाले होते.

मालेगांव येथे २९ सप्टेंबर २००८ रोजी बॉम्बस्फोटा झाला होता. त्यात सहाजणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत १०१ जण जखमी झाले होते. (Malegaon Blast case)

या घटनेत भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर मुख्य आरोपी आहेत. त्यांच्यासह लेफ्टनंत कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह दहा अन्य आरोपी आहेत. या सर्वांवर दहशतवादी हल्ल्याचा कट, हत्या आणि धार्मिक उन्माद पसरवणे असे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.

महाराष्ट्र एटीएसने केली होती चौकशी

सुरूवातीला या घटनेची चौकशी महाराष्ट्र एटीएसने केली होती. त्यानंतर २०११ मध्ये गुन्ह्याचा तपास एनआयकडे सोपविण्यात आला. त्यानंतर एनआयएनेच सर्व तपास केला. खटल्याशी संबंधित सर्व पुरावेही न्यायालयात सादर करण्यात आले आहेत.

एनआयए कोर्टात सर्व आरोपींना गुरुवारी (८ मे) हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे आजच निकाल सुनावण्यात येईल, अशी शक्यता होती. सर्व आरोपीही हजर झाले होते. तथापि, एनआयए कोर्टाने मुंबई उच्च न्यायालकडे आणखी वेळ मागितल्यामुळे निकाल लांबणीवर गेला. आता ३१ जुलैपर्यंत वाट पहावी लागणार आहे. (Malegaon Blast case) विशेष न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी हा खटला मोठा असून यासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

१९ एप्रिल रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. निकाल काय असेल, असे विचारले असता ठाकूर म्हणाल्या, “सत्य मेव जयते, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. या प्रकरणाला १७ वर्ष झाली. ज्या व्यक्तीवर आरोप होतात एकतर त्याला सत्य ठाऊक असते किंवा ईश्वराला. त्यामुळे सत्याचा कायम विजय होतो, धर्माचा कायम विजय होतो आणि यावेळी देखील होईल, असा मला विश्वास वाटतो.”

हेही वाचा :
शिवसेनेच्या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टाकडून फुटबॉल
पाच भाविक महिलांचा मृत्यू

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर