Mahavitaran: महावितरण प्राधान्याने सोडवणार औद्योगिक ग्राहकांचे प्रश्न

Mahavitaran

कोल्हापूर : प्रतिनिधी : औद्योगिक ग्राहक हे महावितरणचे महत्त्वाचे ग्राहक आहेत. उद्योगधंद्यांमुळे समाजाचा सर्वांगीण विकास होत असतो. त्यामुळे औद्योगिक ग्राहकांचे प्रश्न महावितरण प्राधान्याने सोडवेल, असे आश्वासन महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी दिले. (Mahavitaran)

ताराबाई पार्क कोल्हापूर येथील ‘विद्युत’ कार्यालयात कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांच्या समन्वय बैठकीत ते बोलत होते.

मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कागल-हातकणंगलेचे अध्यक्ष मोहन कुशिरे, उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, संचालक सत्यजित सावंत, सचिन कुलकर्णी, विशाल कामटे, खजिनदार अमृतराव यादव,  शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूरचे उपाध्यक्ष भारत जाधव, सचिव शेखर कुसाळे, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष स्वरूप कदम, संचालक विनयकुमार चौगुले व कोल्हापूर इंजिनियर असोसिएशन उद्यमनगरचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीकांत दुधाने, माजी अध्यक्ष बाबा कोंडेकर, सचिव प्रदीप वरांबळे, कुशल सामानी तसेच या संघटनांचे सदस्य, कोल्हापूर मंडल कार्यालायचे अधीक्षक अभियंता (प्रभारी) दत्तात्रय भणगे, कार्यकारी अभियंते  प्रशांतकुमार मासाळ, सुनील गवळी, अशोक जाधव व सबंधित अधिकारी उपस्थित होते. (Mahavitaran)

औद्योगिक ग्राहकांना मदत करत त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी एक खिडकी योजना ‘स्वागत सेल’ प्रभावीपणे राबवा, देखभाल दुरुस्ती नियमित करा, संवादाकरिता सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करा तसेच उद्योजकांच्या विनंतीनुसार पावसाळ्यात अचानक उद्भवणाऱ्या अडचणी लक्षात घेत देखभाल दुरुस्ती करता अधिकचे साहित्य फिल्डवर तयार ठेवावे अशा सूचना मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

उद्योगांच्या अंतर्गत बिघाडामुळे महावितरणची यंत्रणा बाधित होऊ नये म्हणून उद्योजकांनी हार्मोनिक फिल्टर, स्टॅबिलायझर, आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर तसेच एपीएफसी बसवावे अशी अपेक्षा महावितरणच्या वतीने व्यक्त करण्यात आली. (Mahavitaran) बैठकीत सर्वप्रथम महावितरणकडून सध्या असलेली वीज यंत्रणा, देखभाल दुरुस्ती, उद्योजकांचे प्रश्न सोडवणारी यंत्रणा व भविष्यातील विजेची गरज लक्षात घेऊन केली जाणारी विविध कामे यांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी औद्योगिक संघटना प्रतिनिधींनी त्यांच्या अडचणी व महावितरणकडून असलेल्या अपेक्षा यावर आपली मते मांडली. तसेच महावितरणकडून औद्योगिक ग्राहकांना देण्यात येणारी मोबाईल व्हॅन सुविधा, व्हाँट्स अँप ग्रुपवरून देण्यात येणारी तत्पर माहिती व आयोजित करण्यात आलेल्या या समन्वय बैठकीसाठी आभार मानले.

Related posts

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?

Jaysingrao Pawar मराठ्यांचा इतिहास लखलखीत करणारे संशोधक