Lucknow Murder Case : ते बहिणींना विकणार होते, म्हणून मीच…!

लखनौ : शेजाऱ्यांचा आमच्या मालमत्तेवर डोळा होता. मालमत्ता ताब्यात घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. माझ्या चार बहिणींना हैदराबादमध्ये विकण्याचा त्यांचा डाव होता. मी ते कदापी होऊ देणार नाही. म्हणून मीच हे कृत्य केले…. (Lucknow Murder Case)

सख्ख्या चार बहिणी आणि आईची हत्या करणाऱ्या अर्शद या माथेफिरूने दिलेल्या कबुलीने अक्षरश: थरकाप उडवून दिला आहे. बुधवारची सकाळ लखनौसाठी भयंकर ठरली. एका हॉटेलमध्ये पाच महिलांचे खून झाल्याच्या या घटनेने पोलिसांसह सामान्य नागिरकही हादरून गेले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत २४ वर्षीय अर्शदला ताब्यात घेतल. गुन्ह्यानंतर रेकॉर्ड केलेल्या एका व्हिडिओमध्ये, अर्शदने आपल्या कुटुंबाचे ‘संरक्षण’ करण्यासाठीच हे कृत्य केल्याचे म्हटले आहे.

मूळचे आग्रा येथील हे कुटुंब ३० डिसेंबरपासून हॉटेलमध्ये थांबले होते. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी लखनौ येथे आले होते. अर्शदने कुटुंबीयांच्या जेवणात मादक पदार्थ घातले. काही तासांनंतर, त्याने कथितरित्या काहींचा गळा दाबून, तर काहींची ब्लेडने गळा कापून हत्या केली. मृतांमध्ये अर्शदची आई अस्मा आणि चार बहिणींचा समावेश आहे. (Lucknow Murder Case)

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना पोलिस उपायुक्त (डीसीपी) रवीना त्यागी यांनी सांगितले, ‘हॉटेल शरण जीतच्या खोलीत पाच जणांचे मृतदेह सापडले. स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अर्शद नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. तो आग्रा येथील रहिवासी आहे. प्राथमिक चौकशीत त्याने कौटुंबिक वादातून चार बहिणी आणि आईची हत्या केल्याचे सांगितले. पुढील चौकशी केली जात आहे.

हेही वाचा :

Related posts

कच्च्या कैद्यांचे अंधकारमय भवितव्य

Tiger rescue: वाघ पोहोचला स्वयंपाकघरात

kejari hits back: दहा लाखांचा सूट घालणाऱ्याने ‘शीशमहल’बद्दल बोलू नये