मविआसोबत निष्ठावंत शिवसैनिक : संजय राऊत

पिंपरी-चिंचवड : चिंचवडमध्ये सच्चा शिवसैनिक स्वतःहून पुढे येत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहे. चिंचवडमध्येही महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या साथीने विजयी होतील, असा विश्वास शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. अत्यंत वाईट परिस्थितीतही निष्ठावंत आणि सच्चे शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत राहिले आहेत, असे राऊत म्हणाले. खासदार राऊत यांनी कलाटे यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिक आणि माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.  महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. १६० ते १६५ जागा जागा आम्हाला या निवडणुकीत मिळतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. (Sanjay Raut)

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ