Lost boy Found : कुंभमेळ्यात सापडला पोटचा गोळा!

Lost boy found

नवादा (बिहार) : जत्रा किंवा मेळ्यात दोन भावांची ताटातूट होते किंवा दोघा बहिणींची ताटातूट होते… मोठे झाल्यावर त्यांची परत भेट होते… असे सिन्स जुन्या सिनेमांत मोठ्या प्रमाणावर असत. अशीच ताटातूट झाल्यानंतर परत कुटुंबातील सदस्याची भेट झाल्याची घटना प्रयागराज कुंभमेळ्यात घडली. तेरा महिन्यांचा विकलांग मुलगा आठ महिन्यापासून बेपत्ता होता. कुटुंबाने आणि गावकऱ्यांनी शोध घेतला. पोलिसांनी जाहिराती दिल्या. सोशल मीडियावर पोस्ट फिरल्या, पण मुलगा मिळाला नाही. (Lost boy Found )

पण हिंदी सिनेमाला साजेल असे कथानक घडले. कुंभमेळ्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांना या बेपत्ता मुलाचा फोटो कुंभमेळ्यात दिसला. त्यांनी मुलाच्या पालकांना माहिती दिली. पालक प्रयागराजला पोहोचले आणि आठ महिन्यांनी विकलांग मुलगा आणि कुटुंबाची हृदयस्पर्शी भेट झाली. ताटातूट झालेला पोटचा गोळा इतक्या दिवसांनी सापडला. याचा आनंद कुटुंबाने गावात मिठाई वाटून साजरा केला.(Lost boy Found )

ही कथा आहे बिहारमधील वरिसलीगंज या छोट्या शहरातील. येथील आंबेडकरनगरमधील सुजीत दार यांचा हा १३ वर्षाचा मुलगा. अमरजीत ३० मे २०२४ पासून बेपत्ता होता. गावातील काही ग्रामस्थ प्रयागराजला कुंभमेळ्यासाठी गेले होते. तिथे अनाथालयाबाहेरील फलकावर अमरजीतचा फोटो लावला होता. गावकऱ्यांनी अमरजीतला ओळखले. दिलीप दास यांनी सर्वप्रथम फोटो पाहिला. त्यांनी अमरजीतच्या कुटुंबाला कळवले. दिलीप यांच्यासोबत डॉ. शंभू शरण, कारु दास, प्रभात, राजा, अर्जुन, किशोरी पासवान आणि धोना दास हेही कुंभमेळ्यासाठी आले होते. अमरजीतचे आईवडील पोहोचेपर्यंत ते प्रयागराजला थांबले. अमरदीपचे आईवडील प्रयागराजला आले. गावकऱ्यांनी त्यांची मुलाशी भेट घडवून दिली. आईवडीलांनी त्यांनी उराशी कवटाळले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.

मुलगा अमरजीतला घेऊन कुटुंब गावात परतले. त्यांनी कोर्टात अर्ज करुन सर्व प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर अमरजीतला कुटुंबाकडे सोपवण्यात आले. अमरजीतने सांगितले की, अनिल पासवान नावाच्या व्यक्तीने त्याला फसवून एका ट्रेनमध्ये बसवले. त्यानंतर अलाहाबादच्या एका अनाथालयाला सोडले. अमरजीतच्या आईने सांगितले की, मुलाच्या शोधासाठी पोलीस आणि कुटुंबीयांनी खूप परिश्रम घेतले. पण तो सापडला नाही. आम्ही खूप अस्वस्थ होतो. फसवेगिरी करणारे अनेकजण भेटले. ते पैशाची मागणी करत होते. एका व्यक्तीने दोन लाख रुपयांची मागणी केली होती. त्या व्यक्तीला दहा हजार रुपये युपीआयच्या माध्यमातून दिले होते. आमची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने आम्ही दहा हजार रुपयेच देऊ शकलो. पण आमची फसवणूक झाली, पण कुंभमेळ्याने आमच्या घरात परत आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे. या कठीण काळात आम्हाला सोशल मीडिया आणि अनेक लोकांनी मदत केली त्याबद्दल अमरजीतच्या कुटुंबीयांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.(Lost boy Found )

हेही वाचा :
गोल्डनबाबांकडे सोने, हिऱ्याची घड्याळे!

Related posts

फडणवीसांचे चॅलेंज सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदेंनी स्वीकारले

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नामंजूर

सरकारने एफआयआर घ्यायला का नकार दिला?;  सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांना  सवाल