Liverpool : लिव्हरपूलचा अपराजित ‘पीएसजी’ला धक्का

Liverpool

Liverpool

पॅरिस : चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेमध्ये लिव्हरपूलने गुरुवारी (६ मार्च) २३ सामने अपराजित असणाऱ्या पॅरिस सेंट जर्मेनला १-० असा पराभवाचा धक्का दिला. बदली खेळाडू हार्वे एलियटने या सामन्याच्या अखेरच्या मिनिटांमध्ये केलेला गोल निर्णायक ठरला. (Liverpool)

लिव्हरपूल आणि पीएसजी यांच्यातील उपउपांत्यपूर्व फेरीच्या दोनपैकी हा पहिला सामना होता. पीएसजीने सर्व स्पर्धांमध्ये मिळून यापूर्वीच्या २३ सामन्यांमध्ये अपराजित राहण्याचा पराक्रम केला होता. दुसरीकडे लिव्हरपूलचा संघ हा साखळी फेरीअखेर चॅम्पियन्स लीगच्या गुणतक्त्यात २१ गुणांसह अग्रस्थानी होता. सहाजिकच या दोन तुल्यबळ संघांमधील सामना चुरशीचा होणार, अशी अपेक्षा होती. सामन्याच्या सुरुवातीपासूनच पीएसजीने आक्रमक खेळ करत लिव्हरपूलवर आक्रमणे रचण्यास सुरुवात केली. तथापि, लिव्हरपूलचा गोलरक्षक ॲलिसन बेकरच्या भक्कम बचावामुळे पीएसजीला गल करण्यात यश आले नाही. लिव्हरपूलचे प्रशिक्षक आर्ने स्लॉट यांनीही ॲलिसनचे कौतुक केले. ॲलिसनचा सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. (Liverpool)

सामन्याच्या ८६ व्या मिनिटास लिव्हरपूलचा फॉरवर्ड खेळाडू महंमद सालाहचा बदली खेळाडू म्हणून एलियटला मैदानामध्ये पाठवण्यात आले. या संधीचे सोने करत एलियटने ८७ व्या मिनिटास डार्विन नुनेझच्या पासवर गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी अखेरच्या मिनिटापर्यंत कायम ठेवत लिव्हरपूलने विजयावर शिक्कामोर्तब केले. लिव्हरपूलच्या विजयाने पीएसजीसमोरील आव्हान अधिक कठीण बनले आहे. या दोन संघांमधील दुसरी लढत ११ मार्च रोजी ॲनफिल्ड या लिव्हरपूलच्या घरच्या मैदानावर होणार आहे. उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी पीएसजीला या सामन्यात एकपेक्षा अधिक गोलफरकाने विजय मिळवावा लागेल. (Liverpool)

दरम्यान, गुरुवारी झालेल्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या अन्य सामन्यांत बार्सिलोना संघाने बेन्फिका संघावर १-० अशी मात केली. सामन्याच्या पूर्वार्धात २२ व्या मिनिटास पाओ कुब्रासीला रेड कार्ड मिळाल्यामुळे उर्वरित सामना बार्सिलोनाला दहा खेळाडूंसह खेळावा लागला. उत्तरार्धात ६१ व्या मिनिटास बार्सिलोनाच्या राफिन्हाने विजयी गोल केला. तिसऱ्या सामन्यात बायर्न म्युनिचने लेव्हरकुसनविरुद्ध ३-० असा एकतर्फी विजय मिळवला. बायर्नतर्फे या सामन्यात फॉरवर्ड हॅरी केनने नवव्या मिनिटास मैदानी, तर ७५ व्या मिनिटास पेनल्टीवर असे दोन गोल केले. याशिवाय, मुसिआलाने ५४ व्या मिनिटास बायर्नतर्फे एक गोल केला. (Liverpool)

हेही वाचा :

मुश्फिकूर रहीम वन-डेतून निवृत्त

 भारताची अंतिम लढत न्यूझीलंडशी

Related posts

Dhoni

Dhoni : पुढच्यावेळी योग्य संघबांधणी महत्त्वाची

BCCI Contracts

BCCI Contracts : श्रेयस, ईशानची वापसी

RCB beats PK

RCB beats PK : बेंगळरूची पंजाबला परतफेड