Kakasaheb Patil passess away : निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे निधन

Kakasaheb Patil passess away

निपाणी : कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील निपाणी मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार, आमदार काकासाहेब पांडुरंग पाटील (वय ७१, रा.वाळकी, ता. चिकोडी, जि. बेळगाव ) यांचे मंगळवारी ( दि.१७)  मध्यरात्री दोनच्या सुमारास बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.त्यांच्या निधनामुळे निपाणी तालुक्यावर शोककळा पसरली असून कार्यकर्त्यांना शोक अनावर झाला आहे. दरम्यान त्यांच्या पार्थिवावर आज बुधवारी १८ रोजी दुपारी वाळकी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. (Kakasaheb Patil passess away)

काकासाहेब पाटील यांच्यावर तीन महिन्यापूर्वी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात मानेसह पाठीच्या मणक्यावरील शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना न्युमोनिया झाल्याने त्यांची तब्येत खालावली होती. त्यांना उपचारासाठी बेळगाव येथील केएलई. रुग्णालयात गेल्या महिन्यात दाखल करण्यात आले होते.मात्र त्यांचा उपचारासाठी अल्प प्रतिसाद मिळाल्याने अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. (Kakasaheb Patil passess away)

२५ नोव्हेंबर १९५५ साली त्यांचा वाळकी येथील शिक्षक दांपत्याच्या पोटी जन्म झाला.त्यांनी आपले प्राथमिक व महाविद्यालय शिक्षण पूर्ण करून राजकारणात प्रवेश केला.त्यांनी कणगला जि.प.कार्यक्षेत्रातून पहिल्यांदा निवडणूक लढवत त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीला सुरूवात केली होती.या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. निपाणी विधानसभा मतदार संघातून सलग तीन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांचे वक्तृत्व आणि नेतृत्व तळागाळातील माणसांना आपलेसे करणारे होते. काळम्मावाडी पाणी वाटप करार करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. कर्नाटकसह महाराष्ट्रातील नेत्यांशी त्यांचे निकटचे संबध होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी त्यांचा जवळचा स्नेह होता. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, असा परिवार आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता निपाणी येथील म्युनिसिपल हायस्कूल येथून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.

Related posts

समाजवादी शवपेटीवर गडहिंग्लजला शेवटचा खिळा

मंत्र्यांना शेतकरी आत्महत्याचे काहीच सोयर सुतक नाही :  डॉ.श्रीपाल सबनीस, दमसा साहित्य संमेलनाचे उद्घाटन

गडहिंग्लज येथे दमसा साहित्य संमेलनाचे आयोजन; शनिवारी, रविवारी भरगच्च कार्यक्रम