Kabaddi : कबड्डी संघटनेवरील बंदी उठवणार

Kabaddi

Kabaddi

नवी दिल्ली : भारतीय कबड्डी संघटनेवरील बंदी पुढील महिन्यात मागे घेणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे अध्यक्ष विनोदकुमार तिवारींनी दिली. न्यायालयनियुक्त प्रशासकांनी ‘निर्वाचित कार्यकारिणीकडे’ कार्यभार सोपवल्यामुळे ही बंदी मागे घेण्यात येणार आहे. (Kabaddi)

ॲमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एकेएफआय) निर्वाचित कार्यकारिणीस कार्यभार स्वीकारू न दिल्यामुळे आयकेएफने मागील वर्षी जुलैमध्ये संघटनेवर बंदी घातली होती. डिसेंबर, २०२३ मध्ये एकेएफआयची नवी कार्यकारिणी निवडून आली. यावेळी, विभोर विनीत जैन हे अध्यक्षपदी, तर जितेंद्र ठाकूर हे सरचिटणीसपदी निवडून आले होते. तथापि, दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एकेएफआयच्या विरोधातील याचिकेच्या निर्णयावर त्यांच्या निवडीची मान्यता अवलंबून असल्यामुळे त्यांच्याकडे कार्यभार सोपवण्यात आला नव्हता. (Kabaddi)

दिल्ली उच्च न्यायालयाने २०१९ मध्येच निवृत्त न्यायाधीश एस. पी. गर्ग यांची एकेएफआयच्या प्रशासकपदी नियुक्ती केली होती. २०२३ च्या निवडणुकीनंतरही गर्ग यांच्याकडे कार्यभार कायम राहिल्याने आंतरराष्ट्रीय महासंघाने एकेएफआयवर बंदी घातली. (Kabaddi)
यावर्षी, ६ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने गर्ग यांना संघटनेचा कार्यभार कार्यकारिणीकडे सोपवण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालय अद्याप संघटनेच्या निर्वाचित कार्यकारिणीला मान्यता देत नाही. तथापि, भारतीय कबड्डी संघांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेता यावा, यासाठी हा आदेश देत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. “आता एकेएफआयच्या कार्यकारिणीने जेएलएन स्टेडियममधील कार्यालयात कामकाज सुरू केल्यामुळे संघटनेवरील बंदी उठवण्यात येईल. पुढील महिन्यात महासंघाच्या कार्यकारी समितीची बैठक होणार असून त्यामध्ये बंदी उठवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल,” असे तिवारी म्हणाले. (Kabaddi)

हेही वाचा :
भांबरी-बोर्जेस उपांत्यपूर्व फेरीत
शफालीची ‘ग्रेड बी’ कायम

Related posts

Anant Dixit award

Anant Dixit award: अनंत दीक्षित पुरस्कार कुमार केतकर यांना

Pope Francis died

Pope Francis died : पोप फ्रान्सिस यांचे निधन

Om Prakash

Om Prakash : पोलिस अधिकाऱ्याची राहत्या घरी हत्या