भ्रष्टाचार बाहेर काढणा-या पत्रकाराची छत्तीसगडमध्ये हत्या

छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मुकेश चंद्राकर या तरुण पत्रकाराची हत्या करुन मृतदेह सेप्टिक टँकमध्ये लपवल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळेदेशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. रस्ते बांधकामातील भ्रष्टाचारासंदर्भात बातम्या दिल्यामुळे ठेकेदाराकडून ही निर्घृण हत्या घडवून आणण्यात आली. प्राथमिक तपासातून तसे उघड झाले आहे. देशभरातील पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.(Mukesh Chandrakar)

`बस्तर जंक्शन` नामक यूट्यूब चैनल चालवणारा तसेच एनडीटीव्हीसाठी मुकेश चंद्रकार (वय ३२) काम करीत होता. एक जानेवारीच्या संध्याकाळपासून तो बेपत्ता होता. एका कंत्राटदाराच्या कंपाऊंडमधील सेप्टिक टँकमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. मुकेश चंद्राकरची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली असून त्याच्या डोक्यावर गंभीर जखमा आढळल्या आहेत.(Mukesh Chandrakar)

कंत्राटदाराच्या भावाचे धागेदोरे

मुकेश एक जानेवारीला सायंकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर काही वेळानंतर त्याचा फोन बंद झाला. दोन जानेवारीला सायंकाळपर्यंत फोन बंद राहिल्यानंतर कुटुंबीयांचा संशय बळावला. त्यांनी त्यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. मुकेशचा भाऊ युकेशने फिर्याद दिली. कंत्राटदार सुरेश चंद्राकरचा भाऊ रितेश चंद्राकर त्याला भेटणार होता.  मुकेशने त्याचा पत्रकार मित्र नीलेश त्रिपाठीला तसे सांगितले होते. एक जानेवारीला सायंकाळी सहाच्या सुमारास मुकेशनेच नीलेशला त्याने ही माहिती दिली होती.

शेवटच्या लोकेशनवरून शोध

मुकेशच्या शेवटच्या लोकेशनचा शोध घेतल्यानंतर ते कंत्राटदाराच्या कंपाऊंडमध्ये दाखवत होते. कंत्राटदार सुरेश चंद्राकरने तयार केलेल्या रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचारासंदर्भातील बातमी मुकेशने दिली होती. त्यावरून सरकारने चौकशी समिती नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. अशी माहिती युकेशने पोलिसांना दिली. पोलिसांनी शोध सुरू केल्यानंतर ठेकेदाराच्या कंपाऊंडमधीस सेप्टिक टँकचे काम नव्यानेच केलेले दिसून आले. संशय बळावल्यामुळे तेथे शोध घेतला असता टँकमध्ये मुकेशचा मृतदेह आढळून आला.(Mukesh Chandrakar)

रस्त्याच्या निकृष्ट कामाचा रिपोर्ट

मुकेश चंद्राकरने ठेकेदाराच्या विरोधात २४ डिसेंबरला एनडीटीव्हीसाठी रिपोर्ट केला होता. बीजापूरच्या गंगालूरपासून नेलशनारपर्यंतच्या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा हा रिपोर्ट होता. रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचे, तसेच एक किलोमीटरच्या रस्त्यात ३५ खड्डे असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले होते. १२० कोटींच्या या कामामध्ये ५२ किलोमीटरचा रस्ता होता, त्यापैकी ४० किलोमीटरचे काम पूर्ण झाले होते. रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यानंतर सरकारने चौकशीसाठी समिती नियुक्त केली होती. याप्रकरणी मुख्य संशयित कंत्राटदार सुरेश चंद्राकर फरारी असून त्याचा भाऊ रितेश चंद्राकरसह तिघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान सरकारने ठेकेदाराच्या अनेक ठिकाणच्या अवैध बांधकामांवर बुलडोझर कारवाई सुरू केली.(Mukesh Chandrakar)

हेही वाचाः

Explosion: फटाका कारखान्यात सहा कामगार होरपळले
कच्च्या कैद्यांचे अंधकारमय भवितव्य
vehicle falls into gorge: लष्कराचे वाहन दरीत कोसळले

Related posts

Ant trafficking

Ant trafficking: मुंग्यांची तस्करी वाढतेय…

32 burglaries solved

32 burglaries solved : तीन चोरट्यांकडून ३२ घरफोड्या

Rahul Gandhi visit

Rahul Gandhi visit: दहशतवादाविरुद्ध एकजूट असणे महत्त्वाचे