नैरोबी (केनिया) : वन्यजीवांचे अवशेष, दुर्मिळ प्राण्यांची तसेच दुर्मिळ वनस्पतींच्या तस्करीच्या घटना कुठे ना कुठे नेहमीच घडत असतात. मानवी तस्करी हा आणखी एक वेगळा अभ्यासाचा विषय. पण वन्यजीवांचे आगर असलेल्या केनियाला आता एका वेगळ्याच प्रकारच्या तस्करीने ग्रासले आहे. तेथील वन्यजीव अभ्यासक, पर्यावरणप्रेमी आणि सुरक्षायंत्रणांच्यादृष्टीनेही ही चिंतेची बाब झाली आहे. ती आहे मुंग्यांच्या तस्करीची. ‘मुंग्यांची टोळी’ म्हणून आता ही टोळी म्हणून कुप्रसिद्ध होऊ लागली आहे. (Ant trafficking)
आंतरराष्ट्रीय बाजारात अफू, चरस, गांजा, सोने-चांदी आदींची तस्करी होत असते. पण एका प्रजातीच्या मुंग्यांची तस्करीही उघड झाली आहे. आंतरराष्ट्रीय या जातीच्या एका मुंगीची किंमत आहे १३० डॉलरपेक्षा जास्त. म्हणजे किमान १२ हजार रुपये.
मेसर सेफॅलोट्स ही या मुंग्याची प्रजाती. या मागणीला प्रचंड मागणी आहे. पूर्व आफ्रिकेतील एक विशिष्ट, मोठी, लाल रंगाची कापणी करणारी ही मुंगी. या दुर्मिळ प्रजातीची ऑनलाइन तस्करी होऊ लागली आहे. (Ant trafficking)
या जिवंत मुंग्यांच्या बेकायदेशीर तस्करीशी संबंधित एका खटल्याची सुनावणी करताना केनियाची राजधानी नैरोबी येथील एका न्यायालयाने करताना आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले आहे.
या मुंग्यांचा बेकायदा ताबा आणि तस्करी केल्याप्रकरणी १५ एप्रिल २०२५ रोजी, दोन बेल्जियन, एक व्हिएतनामी आणि एका केनियन नागरिकाला जोमो केन्याटा आंतरराष्ट्रीय विमानतळ (जेकेआयए) कायदा न्यायालयाने दोषी ठरवले.
लोर्नॉय डेव्हिड आणि सेप्पे लोडेविज्केक्स अशी या बेल्जियम नागरिकांची नावे आहेत. त्यांच्याकडे टेस्ट ट्यूबमध्ये पॅक केलेल्या हजारो मुंग्या आढळल्या. त्यांच्यावर वन्यजीव तस्करीचा आरोप लावण्यात आला. एका गेस्ट हाऊसमध्ये २,२४४ सिरिंज आणि लोकरने भरलेल्या टेस्ट ट्यूबमध्ये ५,००० मुंग्या साठवून ठेवण्यात आल्या होत्या. ५ एप्रिल रोजी ही घटना उघडकीस आली होती.
विशिष्ट पद्धतीचे कंटेनर
आणखी एका वेगळ्या प्रकरणात, केनियाचे नागरिक डेनिस न्गांगा आणि व्हिएतनामी नागरिक दुह हुंग न्गुयेन यांच्यावरही त्याच न्यायालयात तस्करीचा आरोप ठेवण्यात आला आहे. या दोघांनी अत्यंत हुशारीने डिझाइन केलेल्या कंटेनरमध्ये ४०० मुंग्या पाठवण्याचा प्रयत्न केला होता. या मुंग्या ते बाहेरच्या देशात पाठवणार होते. लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान मुंग्या जिवंत राहतील आणि तस्करीचा कुणाला संशयही येणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी हे कंटेनर तयार केले होते. (Ant trafficking)
परवानगीशिवाय जिवंत वन्यजीव प्रजातींची तस्करी केल्याबद्दल केनियाच्या वन्यजीव संवर्धन आणि व्यवस्थापन कायदा २०१३ च्या कलम ९५(ब) अंतर्गत या आरोपींवर आरोप आहेत.
केनियामध्ये हत्ती आणि गेंडे यासारख्या मोठ्या प्राण्यांच्या शरीराच्या अवयवांची तस्करी सर्वसामान्यपणे होत असते, परंतु केनिया वन्यजीव सेवा (केडब्ल्यूएस) ने या प्रकरणाचे वर्णन ‘तस्करीच्या ट्रेंडमध्ये प्रतिष्ठित मोठ्या सस्तन प्राण्यांपासून कमी ज्ञात, परंतु पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील प्रजातींपर्यंत बदल’ असे केले आहे.
अधिकाऱ्यांनी या अटकेचे स्वागत केले आहे. विदेशी वन्यजीव व्यापार रोखण्यासाठी एक मैलाचा दगड असे म्हटले आहे. या टोळीने युरोप आणि आशियातील बाजारपेठांमध्ये मुंग्यांची तस्करी केली. ‘मुंग्यांची टोळी’ म्हणून आता ही टोळी म्हणून कुप्रसिद्ध होऊ लागली आहे.
विमानळावरील सुरक्षेला चकवा
मुंग्या आणि तत्सम कीटकांची तस्करी करताना ही टोळी विशिष्ट पद्धतीने पॅकेजिंग करते. त्यामुळे विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा आणि स्कॅनिंग यंत्रणेला चकवा देता येतो, असे ‘केडब्ल्यूएस’ने नमूद केले. शिवाय या पॅकेजिंगमुळे दोन दोन महिने हे कीटक जिवंत राहू शकतात. केनियाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या मुंग्यांची किंमत १ दशलक्ष शिलिंग (साडे सहा लाख रुपये) असल्याचा अंदाज बांधला आहे. तथापि, प्रजाती आणि बाजारातील मागणीनुसार किमतीत मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतात. (Ant trafficking)
केनियाचा कायदा
केनियाच्या कायद्यानुसार, कोणत्याही वन्यजीव प्रजातीचा बेकायदेशीर ताबा किंवा तस्करी केल्यास जबर शिक्षेची तरतूद आहे. किमान १०,००० डॉलर्सचा दंड आणि पाच वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षेचा त्यात समावेश आहे.
पर्यावरण संतुलनात महत्त्वाची भूमिका
नैरोबी येथील आफ्रिका वाइल्डलाइफ फाउंडेशनचे फिलिप मुरुथी यांनी मुंग्यांचे पर्यावरणीय महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले की या मुंग्या माती समृद्ध करतात, बियाणे उगवण करण्यास मदत करतात. पक्ष्यांसारख्या प्रजातींना अन्न पुरवतात.
मेसर सेफॅलोट्स मुंग्या परिसंस्थेत बियाणे पसरवणाऱ्या म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे वनस्पती संतुलनात मदत होते. कीड नियंत्रणातही त्या हातभार लावतात.
(सौजन्य : डाऊन टू अर्थ)
हेही वाचा :
मोसादचा ‘तो’ अहवाल अन् रशियन प्रोपगंडा!