JM Salunkhe death : शिक्षण क्षेत्रातील भीष्माचार्य जो. म. साळुंखे यांचे निधन

JM Salunkhe death

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिक्षण क्षेत्रातील भीष्माचार्य आणि राजर्षि शाहू विद्यानिकेतन शिंगणापूरचे माजी प्राचार्य जोतिराव मशनूराव उर्फ जो. म. साळुंखे  यांचे निधन झाले. इचलकरंजी येथे वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (JM Salunkhe death)

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथील राजर्षि शाहू छत्रपती विद्यानिकेतनचे नाव कोल्हापूरच्या शैक्षणिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी वेगवेगळ्या नामांकित ठिकाणी प्राचार्य म्हणून काम केले. शहीद शिक्षण प्रसारक मंडळासह अन्य अनेक शिक्षण संस्थांचे ते मार्गदर्शक होते.(JM Salunkhe death)

साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रेरणेने असंख्य विद्यार्थी घडले. विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी प्रशासकीय, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीयसह विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवला. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी ज्ञानेश्वर मुळ्ये, जागतिक शिक्षणतज्ञ आणि ‘नॅक’चे सल्लागार डॉ. जगन्नाथ पाटील, आयपीएस दिगंबर प्रधान, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, कोल्हापूरच्या सेवा रुग्णालयाचे निवृत्त अधीक्षक डॉ. उमेश कदम, माजी विभागीय आयुक्त विलास पाटील, डॉ. बबन पाटील, डॉ. कुर्ले, डॉ. वाघ डॉ .अरुण पाटील, डॉ.धनंजय गिरमल यांसारख्या वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित मंडळींसह सर्वच क्षेत्रात भरीव योगदान दिलेले असंख्य विद्यार्थी साळुंखे यांनी घडवले.(JM Salunkhe death)

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (दि. २३) रोजी इचलकरंजी स्मशानभूमी येथे होणार आहे.

हेही वाचा :

 रेल्वे अपघातात अकरा प्रवासी ठार

 

Related posts

पेपरफुटी आणि एकलव्याचा अंगठा

सह्याद्रीत साकारले ‘पक्ष्यांचे गाव’

रे क्षणांच्या संगतीने….