JCB Award : सर्वांत मोठा साहित्य पुरस्कार बंद

JCB Prize

नवी दिल्ली : भारतीय साहित्यविषयक पुरस्कारांचा विचार करता अत्यंत महत्त्वाचा असलेल्या आणि देशात सर्वांत मोठा समजला ‘जेसीबी’ साहित्य पुरस्कार बंद करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. साहित्य वर्तुळासाठी ही अत्यंत धक्कादायक घटना मानली जात आहे. (JCB Award)

२५ लाखाचा हा पुरस्कार बंद करण्यात येत असल्याचे जेसीबी पुरस्कारा (साहित्य) च्या संचालिका मीता कपूर यांनी सांगितले. त्यांनी निर्णय घेण्यामागील घटनांबद्दल तपशीलवार माहिती देण्यास नकार दिला. हा पुरस्कार बंद करण्यात येत आहे. बाकी विषयावर टिप्पणी करू नका, असे त्या म्हणाल्या.

शेवटचा पुरस्कार २०२४ मध्ये ‘लोरेन्झो सर्चेस फॉर द मीनिंग ऑफ लाईफ’ साठी लेखक उपमन्यू चॅटर्जी यांना देण्यात आला होता.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ८(५) अंतर्गत जेसीबी लिटरेचर फाउंडेशनला जारी केलेला परवाना रद्द केल्यानंतर ही बातमी आली आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने हे वृत्त दिले आहे. (JCB Award)

जेसीबी पुरस्कार वेबसाइटवर १२ मार्च रोजी दिलेल्या सूचनेनुसार, फाउंडेशनने परवाना रद्द करण्यासाठी दिल्ली आणि हरियाणा येथील कंपनी रजिस्ट्रारकडे अर्ज पाठवला होता. त्यावर ‘‘कंपनीला ‘फाउंडेशन’ ऐवजी ‘प्रायव्हेट लिमिटेड’ असा बदल तिच्या नावापुढे करावा लागेल,’’ अशी सूचना देण्यात आली होती. भारतातील साहित्य कलेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या या फाउंडेशनकडून साहित्यिक पुरस्कार देण्यात येत.

२०१८ मध्ये हा पुरस्कार सुरू करण्यात आला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात रोख पारितोषिक देण्यात येत होती. तो भारतीय कथा, विशेषतः भाषांतरासाठी हा पुरस्कार देण्यात येत असे. आतापर्यंत जाहीर झालेल्या सात पुरस्कारांपैकी, पाच वेळा अनुवादित साहित्य कलाकृतीला हा पुरस्कार देण्यात आला आहे. (JCB Award)

२०१८ मध्ये बेन्यामिन यांच्या ‘जास्मिन डेज’ला हा पुरस्कार मिळाला होता. शहनाज हबीब यांनी मल्याळममधून त्याचा अनुवाद केला होता. २०२० मध्ये एस. हरीश यांनी लिहिलेले ‘मस्ताश’ जो जयश्री कलाथिल यांनी मल्याळममधून अनुवादित केला होता त्याला; २०२१ मध्ये एम. मुकुंदन यांनी लिहिलेल्या ‘दिल्ली: अ सोलिलोक्वी’; याचाही मल्याळममधूनच अनुवाद करण्यात आला होता. फातिमा ईव्ही आणि नंदकुमार के यांनी हा अनुवाद केला होता त्याला; २०२२ मध्ये खालिद जावेद यांनी उर्दूतून लिहिलेल्या ‘द पॅराडाईज ऑफ फूड’ या बर्मन फारूकी यांच्या साहित्यिक कलाकृतीला आणि २०२४ मध्ये पेरुमल मुरुगन यांनी लिहिलेल्या ‘फायर बर्ड’ला पुरस्कार मिळाला होता. तमिळमधून जननी कन्नन यांनी हा अनुवाद केला होता, तर २०१९ चा पुरस्कार विजेता माधुरी विजय यांनी लिहिलेला ‘द फार फील्ड’ देण्यात आला होता.

लेखकाला २५ लाख तर अनुवादकाला १० रूपये देऊन या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असे.

मुरुगन यांचे २०१८ मध्ये ‘पूनाची’ आणि २०१९ मध्ये ‘अ लोनली हार्वेस्ट’ आणि ‘ट्रायल बाय सायलेन्स’हे जेसीबी पुरस्काराच्या शॉर्टलिस्टमध्ये होते. तेही या पुरस्काराचे मानकरी आहेत. (JCB Award)

हा पुरस्कार बंद करण्यात येत असल्याची बातमी ऐकून खूप दु:ख झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘भारतीय साहित्यासाठी, विशेषतः भारतीय भाषांसाठी ही दुःखद घटना आहे. जेसीबी पुरस्काराने भारतीय भाषांचा गौरव केला. साहित्याच्या अनुवादाच्या कामाचा सन्मान केला. हा एक मोठा पुरस्कार होता. भारतीय भाषांना या पुरस्काराने महत्त्वाचे स्थान दिले.’’

मुरुगन यांची ‘माधोरुभागन’ ही कादंबरी प्रसिद्ध आहेत. ‘वन पार्ट वुमन’ नावाने तिचे इंग्रजी भाषांतर झाले आहे.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर