R M mohite : उद्योगपती आर.एम. मोहिते यांचे निधन

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापुरातील प्रसिद्ध उद्योगपती रामचंद्र मारुती उर्फ आर. एम. मोहिते (वय ९२) यांचे आज (दि.१९) सायंकाळी निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी (दि.२०) सकाळी पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. गेले काही दिवस ते आजारी होते. मोहिते उद्योग समुहाचे दिलीप मोहिते व शिवाजी मोहिते यांचे ते वडिल होते. (R M mohite)

उद्योगपती मोहिते यांचा जन्म करवीर तालुक्यातील केर्ले या गावी झाला. कमी शिक्षण, आर्थिक परिस्थिती बेताची असताना अथक कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी बांधकाम व्यावसायिक म्हणून नाव कमावले. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर राज्यात निर्माण झालेल्या अनेक धरणाच्या बांधकामात त्यांचा मोठा वाटा होता. शिस्त आणि व्यवसायावर निष्ठा ठेवत त्यांनी कुटुंबातील सदस्यांबरोबर अनेक होतकरु उद्योजकांना सहकार्य केल्याने कोल्हापूर जिल्ह्यात उद्योजकांची फळी निर्माण झाली. आर.एम. मोहिते यांची अण्णा अशी ओळख होती. पांढऱ्या रंगाचा कुर्ता, धोतर आणि डोक्यावर पांढरी टोपी अशा वेषभूषेतील आर.एम. मोहिते करारी स्वभावाचे होते. कमी शिक्षण असतानाही त्यांनी बांधकाम व्यवसायात आधुनिकतेचा स्वीकार केला. बांधकाम व्यवसायाबरोबर कॉटन मिलमध्ये प्रगती केली. आर.एम. मोहिते इंडस्ट्रीज, आर.एम. मोहिते कंपनीज, मोहिते टेक्सस्टाईल मिल्ससह अनेक व्यवसाय उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. (R M mohite)

कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने आर.एम. मोहिते यांना माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या हस्ते मानपत्र देण्यात आले होते. डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा सन २०२२ चा ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार’ मोहिते यांना देण्यात आला होता. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.

हेही वाचा :

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी