इराणला नमवून कबड्डीत भारताने सुवर्ण पदक जिंकले

India's double gold triumph in kabaddi at the Asian Games

नवी दिल्ली : नागोवा अशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये भारताने अतिशय चुरशीच्या सामन्यात इराणचा ४०-३५ असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. भारतीय महिला संघानेही इराण संघाचा पराभव करुत सुवर्णपदक पटकावल्याने कबड्डीमध्ये भारताचा डबल धमाका पहायला मिळाला. भारतीय महिलांनी इराणवर ३७-३४ असा विजय मिळवला. पुरुषांच्या गोळाफेकमध्ये तजिंदरपालने रौप्य पदक तर ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्राची चौधरीने ब्राँझ पदक पटकावले. (India’s double gold triumph in kabaddi at the Asian Games)

मध्यंत्तरास इराण एक गुणाने आघाडीवर

पुरुष कबड्डीमध्ये भारताने सुवर्णपदक पटकावले. भारताने इराणला ४०-३५ अशा गुणांनी हरवले. या स्पर्धेतील भारताचे हे चौथे सुवर्णपदक आहे. इराणने भारताला कडवी झुंज दिली. मध्यंत्तरास इराण संघ १८-१७ असा आघाडीवर होता. पण दुसऱ्या राऊंडमध्ये भारताने जोरदार आघाडी घेतली. इराणचा ऑल आऊट केल्याने सामना संपण्यास दहा मिनिटे शिल्लक असताना भारताने २९-२४ अशी आघाडी घेतली होती. इराणने सामन्यात आघाडी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. पण भारतीय खेळाडूंनी संयम राखत सामन्यावर पकड कायम ठेवली. (India’s double gold triumph in kabaddi at the Asian Games)

मॅरेथॉनमध्ये सावन बारवालने पटकावले रौप्य पदक

पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये सावन बारवालने २ तास ११ मिनिटे ३७ सेंकद अशी राष्ट्रीय विक्रमी वळ देत रौप्य पदक पटकावले. शूटिंगमध्ये महिलांच्या  ५० मीटर रायफल थ्री प्रकारातही भारतीय संघाने रौप्य पदकांची कमाई केली. आशी चौकसे, तिलोत्तमा सेन आणि विदर्सा विनोद यांचा समावेश होता. ४०० मीटर धावण्याच्या शर्यतील भारताच्या प्राची चौधरीने ब्राँझपदक पटकावले. प्राचीने ५३.२१ सेकंदाची वेळ दिली. बहरीनच्या सलवा नासेरने सुवर्णपदक तर इराणच्या झोरई मानौजने रौप्य पदक पटकावले.

गोळाफेकमध्ये तजिंदरपालला रौप्य

तजिंदरपालने पुरुषांच्या गोळाफेकमध्ये रौप्य पदक पटकावले. पण त्याचे सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. २०१८ मध्ये जकार्ता आणि २०२२ मध्ये हांगझू अशियाई स्पर्धेत तजिंदरपालने सुवर्णपदक पटकावले होते. इराणच्या मोहम्मदरेझा तय्यबिसेने सुवर्णपदक जिंकले तर सौदी अरेबियाच्या मोहम्मद तोलून ब्राँझ पदक पटकावले. (India’s double gold triumph in kabaddi at the Asian Games)

Related posts

ज्ञानेश कुमारांनी राजीनामा न दिल्यास पुन्हा जंतरमंतरवर जाणार :  अभिजीत दिपकें

उपमुख्यमंत्रीचे पुत्र म्हणून पार्थ पवाराना वेगळा न्याय मिळतोय का?

प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या २०० खेळाडूंचा होणार गौरव